पुणे दि०६ :- पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सुस व म्हाळुंगे या दोन गावांची पालकत्वाची जबाबदारी बाणेर चे ज्येष्ठ नगरसेवक बाबुराव चांदेरे यांच्याकडे सोपविण्यात आलेली आहे. त्याअनुषंगाने बाबुराव चांदेरे यांनी सुस व म्हाळुंगे या दोन्ही गावात जाऊन स्वतंत्र बैठका घेतल्या आणि तेथील नागरिकांशी सुसंवाद साधला.
नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या ह्या अडचणी जाणून घेत असताना नागरिकांना दिलासा देण्याचे काम केले. कारण यापूर्वी ही गावे आरक्षणाच्या भीतीपोटी सारंगी समितीच्या आदेशाने वगळण्यात आली होती.त्या अनुषंगाने बाबुराव चांदेरे यांनी पुणे महानगरपालिका आणि ग्रामस्थ यांच्यामध्ये कसे समन्वय रहावे आरक्षणाच्या बाबतीमध्ये सविस्तर माहिती सांगितली.पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात व्यवस्थित माहिती सांगितली घनकचरा , विद्युत, रोड, ड्रेनेज इत्यादी आणि ज्या मूलभूत सुविधा असेल.या संदर्भामध्ये त्या भागाचे संग्राम थोपटे, सुप्रियाताई सुळे, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार , काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि महाविकास आघाडीच्या सर्व नेते मंडळींशी चर्चा करून या परिसरात विकासाला चालना देण्याचा आम्ही सर्वजण प्रामाणिकपणे व निश्चितपणे प्रयत्न करू अशी ग्वाही स्थायी समितीचे माजी अध्यक्ष तथा नगरसेवक बाबुराव चांदेरे यांनी यावेळी ग्रामस्थांना दिली .या सभेकरता करिता ग्रामस्थांनी प्रचंड प्रतिसाद दिला यावेळी म्हाळुंगे गावा मधील नागरिकांनी एक सूचना उपस्थित केली ते म्हणजे म्हाळुंगे गावाचा पी एम आर डी च्या मार्फत आमची हायटेक सिटी ही सिटी पी एम आर डी ने तयार केलेली आहे.तिची कार्यवाही यापुढच्या काळात पी एम आर डी करणार की पुणे महानगरपालिका करणार हा मोठा संभ्रम म्हाळुंगे ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे , यावेळी चांदेरे यांनी पालकमंत्री अजितदादा पवार यांच्याशी या विषयावर सविस्तर चर्चा करून यासंदर्भात ग्रामस्थ , पी एम आर डी चे वरिष्ठ अधिकारी व पुणे महानगरपालिकेचे अधिकारी यांच्यामध्ये एक मिटिंग आयोजित करून यावर निर्णय घेऊयात असे आश्वासन ग्रामस्थांना यावेळी दिले .
या मीटिंग मुळे सुस व म्हाळुंगे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले कारण की आपला विचार करणारा , आपल्या मूलभूत गरजा व समस्या समजून घेणारा तसेच नागरी सुविधांचा विचार करणारा आपल्याकडे आला आहे.आज आपल्यासमोर आहे त्यामुळे नागरिकांमध्ये विश्वासाचे नाते दिसून आले यामध्ये महाविकास आघाडीतील महत्त्वाचा घटक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.दि.३ जुलै रोजी पक्षाने या संदर्भात निर्णय घेतला आणि दि.४ जुलै रोजी पत्राद्वारे कळविण्यात आले त्यावर तातडीने नगरसेवक बाबुराव चांदेरे यांनी सुस आणि म्हाळुंगे गावातील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या