श्रीगोंदा दि :०६:- आदर्श गाव मढेवडगांव ग्रामपंचायतीच्या रिक्त झालेल्या उपसरपंचपदी दिपक पोपट गाडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी सरपंच महानंदा फुलसिंग मांडे यांच्या अध्यक्षतेखाली व ग्रामसेवक बी.ए.माने यांच्या मार्गदर्शनाखाली हि उपसरपंच पदाची निवडणूक पार पडली.उपसरपंच जयश्री भगवान धावडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी हि निवडणूक घेण्यात आली. यावेळी निर्धारित वेळी दिपक भगवान धावडे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची उपसरपंच पदी निवड झाल्याचे सरपंच महानंदा फुलसिंग मांडे व ग्रामसेवक बी.ए.माने यांनी जाहीर केले. उपसरपंच पदी निवड झाल्याने दिपक पोपट गाडे यांचे उपस्थितांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.याप्रसंगी प्रा.फुलसिंग मांडे,थोर देणगीदार अंबादास गायकवाड,काळूराम ससाणे,लक्ष्मण मांडे, गणेश मांडे ,बापूराव बर्डे ,राहुल साळवे ,भगवान धावडे,अंबादास मांडे,संदीप मांडे ,अमोल गाढवे ,तंटामुक्ती अध्यक्ष सचिन उंडे,गेना मांडे,बापु गाडे,सुधीर गाडे, लक्ष्मण गाडे, संभाजी गाडे आदी उपस्थित होते. यावेळी प्रा.फुलसिंग मांडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार दिपक गाडे यांनी मानले.