कर्जत दि १३ :- कर्जत पोलिसांनी श्रीगोंदा ते जामखेड रोडवर पिर फाटा नजीक कत्तलीसाठी जाणाऱ्या पाच खिलारी जातीच्या गाईची वाहतूक करणाऱ्या वाहनासह पकडले.या कारवाईत सुमारे चार लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.याबाबत कर्जत पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि,कर्जत पोलिस स्टेशनचे पोलीस अधिकारी आणि जवान हे कर्जत पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना श्रीगोंदा ते जामखेड रोडवर पिरफाटा,कर्जत येथे एक महिंद्रा बोलेरो पिक अप गाडी येताना दिसली.ती गाडी तपासली असता त्यात पाच खिलारी जातीच्या गाई दिसून आल्या त्यानंतर अधिक चौकशी केल्यानंतर गाई कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचे निष्पन्न झाले.याप्रकरणी कर्जत पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीवरून,तूफेल इसाक शेख, वय (२२) रा.खडकत,ता.आष्टी,जि.बीड याच्याविरुद्ध कर्जत पोलीस ठाण्यात प्राण्यांना निर्दयपणे वागविणे आणि प्राणी संरक्षण कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गायींची सुटका करून त्यांना गोशाळेत दाखल करण्यात आले आहे.सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक मनोज पाटील अहमदनगर जिल्हा,अपर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल,उप विभागीय पोलीस अधिकारी कर्जत आण्णासाहेब जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव,सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश माने,पोलीस जवान पांडुरंग भांडवलकर,गोवर्धन कदम, सुनील खैरे,श्याम जाधव, मनोज लातूरकर,महिला पोलीस राणी पुरी यांनी केली आहे.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे