श्रीगोंदा दि १४ :-श्रीगोंदा तालुक्यातील ढवळगाव येथील उद्योजक व नेहमीच सामाजिक कार्यात व अन्नदानाच्या बाबतीत तत्पर असणारे जयेश सतीश रूणवाल यांची अहमदनगर जिल्हा दक्षिण उपाध्यक्षपदी निवड झाली,मानव विकास परिषद महाराष्ट्र म्हणजे शोषित,श्रमीक,पोलीस कोठडी मध्ये मृत्यू,बेकायदेशीर अटक,अत्याचार,शोषित, गुलामगिरी,दहशत,मागासवर्गीयां वर व होणारे अन्याय अत्याचार, सरकारी कार्यालयातील होणारी पिळवणूक,मानवी हक्काचे उल्लंघन,भ्रष्टाचार,शासकीय अधिकाराचा गैरवापर,यासह अनेक कार्यात सहभागी होण्याचा मान मानव विकास परिषदला मिळाला आहे.
तसे नियुक्ती पत्र संस्थापक अध्यक्ष अफसर शेख यांनी त्यांना नुकतेच दिले आहे. निवड झालेले जयेश रुणवाल यांचा अहमदनगर मधील इच्छुकांना मानव विकास परिषद ला जोडण्याचे काम त्यांच्या हातून होणार आहे.अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये वास्तव्यास असणारे रूणवाल यांना नियुक्ती मिळाल्यामुळे त्यांच्यावर ग्रामीण भागातून व अहमदनगर जिल्हा व श्रीगोंदा तालुक्यातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे