पुणे दि १४ :- नोकरीचे अमिष देवुन ऑनलाईन १० रुपयांचे ट्रान्झंक्शन करायला सांगुन ३ लाख ७ हजार २१७ रुपयांची फसवणुक करणाऱ्या आरोपीच्या अकाउंट मधून पैसे परत पुणे शहर सायबर सहा.पोलीस निरीक्षक गणेश पवार यांचे तत्परतेमुळे फिर्यादीला पुर्णपणे रक्कम परत दिनांक ०७/०७/२०२१ रोजी फिर्यादी यांना त्यांचे मोबाईल वर आरोपीने( अज्ञात )व्यक्तीने फोन करुन दुबई येथील जुलेखा हॉस्पीटल येथे जॉब लावुन देतो असे सांगुन आरोपींनी फिर्यादीला एक ऑनलाईन फार्म भरावा लागेल असे सांगितले . त्यांनतर आरोपीनी फिर्यादीला सुरुवातीला रजिस्ट्रेशन फी म्हणुन १० रुपये भरावे लागतील असे सांगुन आरोपीने फिर्यादीचे मोबाईलवर एक लिंक पाठविली,व लिंक फिर्यादीनी ओपन केली, त्यामुळे फिर्यादी यांचे मोबाईलमध्ये एनी डेस्क व एस.एम . एस. फॉरवर्डर हे दोन अॅप डाऊनलोड करण्यास सांगीतले. आरोपींचे सांगणेप्रमाणे फिर्यादी यांनी १० रुपये रजिस्ट्रेशन फी भरल्यानंतर फिर्यादी यांचे डेबिट कार्ड व्दारे एकुण ३ लाख ७ हजार २१७ रुपयांचे ट्रान्झेक्शन झाल्याने फिर्यादी यांची फसवणुक झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने फिर्यादी यांनी तक्रार देण्यासाठी तात्काळ सायबर पोलीस स्टेशन , पुणे शहर येथे गेले. व सायबर पोलीस स्टेशन येथे नेमणुकीस असलेले सहा , पोलीस निरीक्षक . गणेश पवार यांना सदरचे फिर्यादी यांनी झालेला सर्व प्रकार सांगीतला असता सहा.पोलीस निरीक्षक. गणेश पवार यांनी सदरचे घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन , कार्यतत्परता दाखवुन फिर्यादी यांचेकडुन मिळालेल्या माहीतीवरुन वेगवेगळ्या २ पेमेंट मर्चट यांचेशी विनाविलंब पत्रव्यवहार करुन संबंधीत पेमेंट मर्चटचे नोडल ऑफीस यांचेशी संपर्क साधुन फिर्यादीचे अकाऊंडवरुन झालेले फ्रॉड ट्रान्झेक्शन थांबविणेबाबत कळविलेने सदरचे पेमेंट मर्चट यांनी पोलीसांना तात्काळ प्रतिसाद दिल्याने फिर्यादी यांचे अकाऊंट मधुन गेलेले एकुण ३ लाख ७ हजार २१७ रुपये पुन्हा फिर्यादीचे अकाऊंटमध्ये वळविण्यात पोलीसांना यश आले . सदरची कामगिरी ही. पोलीस उप – आयुक्त श्रीमती भाग्यश्री नवटके , सहायक पोलीस आयुक्त. मिलींद पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक. डी . एस . हाके सहा . पोलीस निरीक्षक गणेश पवार , मपोशि . उमा पालवे , मपोशि . पुजा मांदळे यांनी केली आहे . अवाहन – पुणे शहरामधील सर्व नागरीकांना सायबर पोलीस स्टेशन , पुणे शहर यांचेकडुन अवाहन करण्यात येते की , अशा प्रकारे कोणाचीही फसवणुक झाल्यास तात्काळ ( Golden Hours ) सायबर पोलीस स्टेशन , पुणे शहर येथे संपर्क साधावा , तसेच कोणाचेही सांगणेवरुन मोबाईल क्लोन अॅप डाऊनलोड करु नका . कोणत्याही अनाधिकृत लिंक ओपन किंवा शेअर करु नये तसेच मोबाईलवर आलेला ओटीपी , क्रेडीट – डेबीट कार्डचे नंबर कोणासही शेअर करु नका . असे आव्हान पुणे शहर सायबर पोलिसांनी नागरिकांना केले आहे