पुणे दि १४ :- पुणे महानगरपालिका.अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज), रुबल अग्रवाल यांनी, केवळ २० दिवसात व्हॅक्सीन ऑन व्हील उपक्रम अंतर्गत ५ हजार लसीकरण पूर्ण केल्याबद्दल तसेच बेघर, ओळखपत्र नसलेले, तृतीयपंथी यांचे लसीकरण चालू केल्या बद्दल निरामय संस्थेचा सत्कार केला.यावेळी निरामय संस्थेचे विश्वस्त उमेश भोसले, निरामय संस्थेचे अध्यक्ष अॅड. एस. के. जैन, मा. आमदार माधुरीताई मिसाळ, ज्योतिकुमार कुलकर्णी, कार्यकारी विश्वस्त निरामय संस्था हे उपस्थित होते.गेल्या काही दिवसापासून निरामय समाजातील विविध घटकांशी जोडले गेले आहे. दिव्यांग, गतिमंद, अनाथ, तृतीयपंथी, वृद्धाश्रमातील एकाकी वृद्धांचे लसीकरण निरामय संस्थेमार्फत केले आहे. तसेच सेवा वस्तीतील छोट्या-छोट्या घरात राहणाऱ्या व हलू न शकणाऱ्या वृद्धांचे सुद्धा घरी जाऊन लसीकरण केले आहे.तसेच बौद्ध विहार, साधू वासवानी मिशन, पुणे शहर व्यावसायिक संघटना अशा ठिकाणी जाऊन सर्व बांधवांचे व भगिनींचे लसीकरण केले आहे. त्याचबरोबर ज्यांचा व्यापक संपर्क येतो अशा विविध स्तरातील कष्टकरी, रिक्षावाले, पथारीवाले, छोटे व्यावसायिक यांच्यासाठी निरामय संस्था सध्या लसीकरण करत आहे