पुणे ग्रामीण दि १४ :- पुणे जिल्ह्यातील खेडमधील विशेष न्यायालयाच्या अतिरिक्त सरकारी वकिलाला (अभियोक्ता) साडे तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे. पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली आहे. त्यामुळे पुणे जिल्हयातील वकिलांच्या वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.देवेंद्र मधुकर सोन्नीस (वय 57) असे पकडलेल्या वकिलांचे नाव आहे.याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.देवेंद्र हे खेड विशेष न्यायालयात अतिरिक्त सरकारी अभियोक्ता आहेत. ते औंध गावात राहतात.यातील तक्रारदार यांच्या अशिलाचा जामीन अर्ज न्यायालयात आहे.त्यावेळी त्या जामिनावर सुनावणी होत असताना न्यायालयात हरकत घेऊ नये व जामीन मिळण्यासाठी मदत करण्यासाठी लोकसेवक देवेंद्र यांनी 5 हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती.
त्याची तक्रार पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. त्याची पडताळणी करण्यात आली. त्यात लाच मगितल्याचे निष्पन्न झाले.त्यानुसार आज सापळा कारवाईत तडजोडी अंती तक्रारदार यांच्याकडून साडे तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे.विशेष न्यायालयाच्या अतिरिक्त सरकारी वकिलास लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडल्याने पुणे शहर आणि जिल्हयातील वकिल वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
गुन्हा दाखल करण्यात आला आहे.व गुन्हयाचा पुढील तपास पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील अधिकारी करीत आहेत.
सदरची कारवाई. पोलीस उप आयुक्त / पोलीस अधीक्षक .राजेश बनसोडे , ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र व. अपर पोलीस अधीक्षक. सुरज गुरव , ला.प्र.वि. पुणे , सुहास नाडगौडा , अपर पोलीस अधीक्षक , ला.प्र.वि. पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली . शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयास खालील नमुद क्रमांकवर सपंर्क साधण्याचे आवाहन. राजेश बनसोडे , पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग , पुणे यांनी केले आहे . १. हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक १०६४ ॲन्टीकरप्शन ब्युरो , पुणे दुरध्वनी क्रमांक – ०२० – २६१२२१३४ , २६१३२८०२ , २६०५०४२३ ३. व्हॉट्स अॅप क्रमांक पुणे – ७८७५३३३३३३ लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत नागरिकांनी एसीबीकडे तक्रार नोंदवावी असे आवाहन पुण्याच्या एसीबीचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे यांनी केले आहे.