पुणे दि १४:- वेगवेगळ्या कारणांवरून होत असलेल्या सासरच्या छळ होणारा त्रासाला कंटाळून एका विवाहित महिलेने आत्महत्या केली. व सासरच्या चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सन 2011 ते सात जुलै 2021 या कालावधीत पुनावळे येथे घडला.किरण संदीप पाटील वय 36 असे आत्महत्या केलेले विवाहीतीचे नाव आहे. याप्रकरणी तीच्या आईने मंगळवारी दि. 13 या तारखेला वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.त्यानुसार त्यांचे पती संदीप कांतीलाल पाटील वय 40 सासरे कांतीलाल झावरू पाटील वय 56 आणि दोन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी मयत किरण पाटील यांना तिच्या वर्णावरून आरोपींनी वारंवार हिणवले.तसेच भागीदारीमध्ये घेतलेल्या घराच्या हक्क सोडपत्रावर सही करण्यास आणि जबरदस्तीने घटस्फोट देण्यासाठी मानसिक त्रास दिला. या त्रासाला कंटाळून किरण यांनी आत्महत्या केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.याबाबत सासरच्या चार जणांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. या सगळ्या बाबतीत वाकड पोलीस तपास करीत आहेत.