पुणे, दि. २१ :- पुण्यातील चाकण एमआयडीसी परिसरातील भांबोली येथे मुख्य रस्त्याच्या बाजूला असलेले एटीएम अज्ञातांनी स्फोट करून फोडले. एटीएम मधून रोख रक्कम चोरून नेली असून नेमकी किती रक्कम चोरीला गेली याबाबत माहिती मिळू शकली नाही. ही घटना आज बुधवारी, दि.२१ मध्यरात्री घडली.मिळालेल्या माहितीनुसार, चाकण मधील महाळुंगे येथील भांबोली येथे मुख्य रस्त्याच्या बाजूला हिताची कंपनीचे एटीएम आहे. आज मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. एटीएमचे मोठे नुकसान झाले.आहे स्फोट घडवून चोरट्यांनी एटीएम मधून रोकड चोरून नेली.,घटनेची माहिती मिळताच महाळुंगे पोलीस तसेच गुन्हे शाखा आणि श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.