पुणे, दि.२०:- पुणे परिसरातील लोणी काळभोर भागातील एका सराईत गुन्हेगारावर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. त्याला एक वर्षांसाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी एमपीडीए कायद्यानुसार त्याच्यावर कारवाई केली आहे.
ऋषिकेश सुरेश पवार (वय 23, रा. कदमवाकवस्ती) असे स्थानबद्ध करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. ऋषिकेश हा लोणी काळभोर पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर गंभीर 6 गुन्हे दाखल आहेत. तो साथीदारांच्या मदतीने या परिसरात दहशत माजवत असेतर वाहनांची तोडफोड तसेच सार्वजनिक मालमत्ता फोडणे यासह जबरदस्तीने खंडणी गोळा करणे, अश्या गुन्हेगारी कारवाया करत होता. त्याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे परिसरात कायम दहशत असायची. त्याच्या या दहशतीमुळे त्यांच्या विरुद्ध तक्रार देण्यास देखील कोणी येत नसत. तर त्याच्या गुन्हेगारी कारवाया कमी होत नव्हत्या.त्यामुळे लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी त्याला स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव तयार केला.परिमंडळ पाचच्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांच्याकडे प्रस्ताव पाठवला. या प्रस्तावाची पडताळणी करून तो अप्पर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण यांच्यामार्फत पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तायांच्याकडे पाठवला. त्यानुसार पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी ऋषिकेश याला एमपीडीए कायद्यानुसार स्थानबद्धतेची कारवाई केली आहे.