पिंपरी चिंचवड,दि.२८ :- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील अवैध धंदयाचे समुळ उच्चाटन करण्याचे सुचना पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश व पोलीस उप – आयुक्त , परिमंडळ १ मंचक इप्पर साहेब यांनी दिल्याने महाळुगे पोलीस चौकीचे वरिष्ठ पो.निरी अरविंद पवार यांनी गुन्हे शोध व प्रतिबंधक पथकामधील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना साध्यावेशात सक्त पेट्रोलिंग करुन अवैध धंदयाची माहीती प्राप्त करुन कारवाई करण्याबाबत मार्गदर्शन केले होते . दि २५ रोजी मौजे कुरुळी ,येथे गांजा बाळगल्याप्रकरणी चाकण पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. त्याच्याकडून आठ किलो 154 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई खेड तालुक्यातील कुरुळी येथे रविवारी (दि. 25) रात्री करण्यात आली.तात्या मदन काळे (वय 21, रा. खटाटे वस्ती, सोरतापवाडी, ता. हवेली) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलीस नाईक अजय गायकवाड यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुरूळी गावातील ज्ञानराज मंगल कार्यालयाजवळ एक तरुण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती चाकण पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून कारवाई केली.त्यात आरोपी तात्या काळे याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या बॅगची तपासणी केली असता त्यामध्ये आठ किलो 154 ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला. पोलिसांनी गांजा आणि इतर साहित्य असा एकूण एक लाख 69 हजार 80 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदरची कारवाई मा.पोलीस आयुक्त.कृष्ण प्रकाश.अपर पोलीस आयुक्त.रामनाथ पोकळे , पोलीस उप – आयुक्त ( गुन्हे ) सुधीर हिरेमठ ,पोलीस उप आयुक्त , परिमंडळ १ – मंचक इप्पर.सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे , महाळुगे पोलीस चौकीचे पोलीस निरीक्षक अरविंद पवार , पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) दशरथ वाघमोडे यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स.पो.निरीक्षक दत्तात्रय गुळीग , पोलीस अंमलदार राजु कोणकेरी , अमोल बोराटे , विठ्ठल वडेकर , शिवाजी लोखंडे , संतोष | काळे , हिरामन सांगडे , अजय गायकवाड , श्रीधन इचके , शरद खैरे , यांनी पार पाडली . सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप गायकवाड हे करीत आहेत