कर्जत,दि.२८ :-कर्जत तालुक्यातील मुळेवाडी येथील बाळू काशिनाथ जगधने व अजिनाथ काशिनाथ जगधने या शेतकऱ्यांच्या शेतातील १४ ते २२जानेवारी दरम्यान तीन विद्युत मोटरचोरी गेल्या होत्या.मोटरीचा शोध न लागल्याने बाळू काशिनाथ जगधने यांच्या फिर्यादीवरून कर्जत पोलीस ठाण्यात गु.र.नं.२५३/२०२१ भादवि कलम ३७९ प्रमाणे दि.२४ एप्रिल रोजी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर मोटर चोरीबाबत कर्जत पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की,मोटर चोरी ह्या देवा मोहन वायसे,रा.मुळेवाडी याने चोरी करून शब्बीर महबूब शेख,रा.मिरजगाव,ता.कर्जत यांचेकडे दिल्या आहेत. अशी माहिती मिळाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी तात्काळ पोलीस अंमलदार प्रबोध हंचे,भाऊसाहेब यमगर, श्याम जाधव यांना मिरजगाव येथे पाठवून त्या ठिकाणी खात्री केली असता तेथे शब्बीर महबूब शेख,रा. मिरजगाव याच्या ताब्यात मुळेवाडी येथील चोरीच्या तीन पाणी उपसा मोटरी मिळून आल्या. शब्बीर शेख कडे विचारपूस केली असता त्याने सांगितले की, देवा मोहन वायसे रा. मुळेवाडी ता.कर्जत याने मोटर आणून विकल्या आहेत असे सांगितले.
त्यामुळे सदर गुन्ह्यात आरोपी शब्बीर महबूब शेख,रा. मिरजगाव,ता.कर्जत याला अटक करण्यात आली असून देवा मोहन वायसे,रा.मुळेवाडी,ता.कर्जत हा फरार आहे. त्याचा शोध घेण्याचे काम कर्जत पोलिसांकडून सुरू आहे.सदर गुन्ह्याचा तपास हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल साहेब,उपविभागीय पोलिस अधिकारी श्री अण्णासाहेब जाधव,कर्जत विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, कर्जत पोलिस स्टेशन,पो.उप.नि. रमेश साळुंखे, सपोनि सुरेश माने,पोलीस अंमलदार प्रबोध हंचे,भाऊसाहेब यमगर, सुनील मालशिखरे,श्याम जाधव,विकास चंदन,अमित बर्डे, सुनील खैरे यांनी केली आहे.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे