पुणे,दि.३१:- पुण्यातील न्यायालयाचे कामकाज एकाच सत्रात सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत सुरू राहणार आहे. पुढील आदेशापर्यंत हा नियम लागू राहणार आहे. दरम्यान 7 ऑगस्टपासून प्रत्येक शनिवारी न्यायालयाला सुट्टी राहणार असल्याचेही आदेशात नमुद करण्यात आले आहे. न्यायीक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 100 टक्के उपस्थित रहावे लागणार आहे.करोनाच्या परिस्थितीत राज्यातील काही जिल्ह्यातील निर्बंध हटविण्यात आले आहेत. तरीही परिस्थिती पाहता जिल्ह्यासह राज्यातील 11 जिल्ह्यात निर्बंध कायम ठेवण्यात आलेले आहेत. केवळ रिमांड, जामीन आणि अर्जंट दाव्याची सुनावणी होणार आहे. वादी, प्रतिवादी दोन्ही हजर राहिलेल्या दाव्यातच ऑर्डर देण्यात याव्यात.
दरम्यान (दि. 31) शनिवारी न्यायालय सुरू राहणार आहे.पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या शनिवारी न्यायालयाचे कामकाज सुरू राहायला हवे. कारण त्या दिवशी कामाच निपटारा होत असतो. त्यासाठी उच्च न्यायालयाला पत्र लिहणार आहे.
ऍड. सतीश मुळीक, अध्यक्ष, पुणे बार असोसिएशन.