कर्जत,दि.३१:-कर्जत तालुक्यातील शितपूर येथील रहिवाशी रामचंद्र गायकवाड यांच्या घरी काही दिवसांपूर्वी चोरी झालेली आहे.असा फोन कर्जत पोलिसांना दि.२६जुलै रोजी दु.३ वाजेच्या सुमारास आला.त्यानंतर कर्जतचे कार्यतत्पर,कर्तव्यदक्ष व ख्यातनाम अधिकारी चंद्रशेखर यादव यांनी तात्काळ पोलिस अधिकारी व पोलिस जवान यांना घटनास्थळी रवाना केले.मिळालेली माहिती अशी कि, दुपारच्या वेळी तक्रारदार रामचंद्र बाबासाहेब गायकवाड, वय ६७ वर्ष हे आपल्या घरात झोपले असताना अचानक कपाटाचा आवाज आल्याने त्यांना जाग आली. त्यांना घरात चोरटे दिसले. गायकवाड यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली असता त्यांना चोरट्यांनी लोखंडी टॉमीने जबर मारहाण केली व जबरदस्तीने त्यांच्या खिशातील रोख रक्कम घरातील सोन्याचे दागिने असा एकूण २,२०,००० रुपयांचा ऐवज जबदस्तीने काढून घेतला.चोरटे हे नागलवाडीच्या दिशेने पळालेले आहेत अशी माहिती पोलिसांना मिळाल्यावर तात्काळ कर्जत पोलिस व गावकऱ्यांनी समोरच्या गावातील लोकांना फोन केले व पाठलाग करत असताना तीन आरोपींपैकी एक आरोपी ढेबऱ्या उर्फ रामेश्वर राम चव्हाण वय(२५) वर्ष रा. ब्रह्मगाव, ता.आष्टी,जिल्हा बीड हा मिळून आला.त्यास विचारपूस केली असता योग्य माहिती दिली नाही. त्यानंतर कर्जत पोलिसांनी तात्काळ नागलवाडी मधून ज्या दिशेने रोड जातात त्या दिशेला पोलीस अधिकारी व जवान यांना रवाना केले.व पाठलाग सुरू झाला. माहिती घेत घेत शेवटी पोलिसांनी आष्टी येथे रामेश्वर जंगल्या भोसले, वय(२५)वर्ष व धला उर्फ मोहिनी रामेश्वर भोसले वय(२२) वर्ष, रा.आष्टी, जि. बीड,कुकड्या उर्फ प्रफुल्ल भोसले, रा. पिंपरखेड,ता.आष्टी,जि.बीड यांनी केल्याचे कबूल केले असून यांना ताब्यात घेतले. त्यांची सखोल विचारपूस केली व अंग झडती घेतली असता चोरी गेलेला काही माल त्यांच्याकडे मिळून आला.
त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली काळ्या रंगाची होंडा शाईन मोटर सायकल एम. एच.२३ बी.१९५२ सॅमसंग कंपनीचा मोबाइल, सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा १,६२,०७० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यातील अटक आरोपींवर यापूर्वी घरफोडी,जबरी चोरी, दरोडा, दरोड्याचा प्रयत्न असे ४ गुन्हे दाखल आहेत. या आरोपींना मा. न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.ग्रामस्थांनी अशा वेळी ग्राम सुरक्षा यंत्रणेचा वापर करावा, १८००२७०३६०० या क्रमांकावर कॉल करावा. गावातील नागरिकांना आणि ज्या दिशेने चोरटे पळाले आहेत.त्या गावचे नाव घेऊन कॉल करावा. चोरटे मुद्देमालासह मिळून येतील. फक्त आरोपी मिळून आल्यावर त्यांना मारहाण करू नये.-चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक, कर्जत पोलीस स्टेशन.सदरची कारवाई ही मनोज पाटील, पोलीस अधीक्षक अहमदनगर सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक अहमदनगर,आण्णसाहेब जाधव,उपविभागीय पोलिस अधिकारी कर्जत विभाग कर्जत यांचे मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव,सपोनि सुरेश माने,पोसई अमरजीत मोरे, किरण साळुंके, पोहेका प्रबोध हंचे, बबन दहिफळे,पोना शाम जाधव,रवी वाघ, सुनील खैरे,महादेव कोहक,संतोष फुंदे, गोवर्धन कदम,गणेश काळाने,बळीराम काकडे,मपोका राणी व्यवहारे, रिंकी माढेकर यांनी केली.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे