पुणे, दि.३१ :-खूनाच्या प्रयत्नातील केस मधील दाखल गुंन्ह्यात तीन वर्षांपासून फरार असलेल्या गुंडांला जेरबंद करण्यात समर्थ पोलीसांच्या पथकाला यश आले.मेहमुद बाबू घोडके , वय ५६ वर्षे , मुळ रा . ९ ७३ भवानी पेठ , रुपी बँक शेजारी , पुणे सध्या रा . न्यू म्हाडा बिल्डींग , वैदुवाडी , हडपसर , पुणे अशी अटक आरोपींचे नावे आहेत. या
प्रकरणातील समर्थ पोलिस स्टेशनातील तपास पथकाने दि .३० रोजी समर्थ पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक , यांचे आदेशाने पाहिजे आसलेल्या आरोपींचा शोध घेण्याकामी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस ठाण्यातील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस ठाण्यातील तपास पथकातील अधिकारी आणि कर्मचारी हद्दीत गस्त घालत होते.
त्यावळी पोलीस अंमलदार सुमित खुट्टे व निलेश साबळे यांना गोपनीय बातमी मिळाली की , मागील तीन वर्षापासून खूनाच्या प्रयत्नातील पाहिजे आरोपी हा भवानी पेठेत आला असून तो रिक्षा मध्ये बसलेला आहे . तात्काळ गोपनीय बातमी वरिष्ठांना कळवून तपास पथकातील सहा.पोलीस निरीक्षक संदीप जोरे व पोलीस कर्मचारी यांनी सदर ठिकाणी जावून बातमीची खात्री करून पाहिजे आसलेल्या आरोपी हा रिक्षातून पळून जाण्याच्या तयारीत असतांना त्यास शिताफीने ताब्यात घेतले. व आरोपीस विश्वासात घेवून त्यास त्याचे नांव पत्ता विचारता त्याने त्याचे नांव मेहमुद बाबू घोडके , वय ५६ वर्षे , मुळ रा . ९ ७३ भवानी पेठ , रुपी बँक शेजारी , पुणे सध्या रा . न्यू म्हाडा बिल्डींग , वैदुवाडी , हडपसर , पुणे असे असलेचे सांगीतले . सदरचा आरोपीबाबत अभिलेखाची पहाणी करून माहिती घेत असतात तो १२०/२०१८ भादविक . ३०७,१४३,१४७,१४८,१४ ९ , ५०४ मपोकाक . ३७ ( १ ) सह १३५ व आर्स अॅक्ट कलम ४/२५ मध्ये पाहिजे आसलेला आरोपी होता . त्याचेकडे नमुद गुंन्हयाबाबत चौकशी चौकशी केली असता 2018 मध्ये त्याने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. गुंन्हा घडलेपासून आरोपी हा वारंवार पत्ता बदलून रहात असलेने मिळून येत नव्हता . सध्या आरोपी हा हडपसर येथे त्यांच्या कुटूंबासह रहात आहे . सदरची कामगिरी ही, डॉ . संजय शिंदे , अपर पोलीस आयुक्त , पश्चिम प्रादेशीक विभाग , पुणे शहर , श्रीमती प्रियंका नारनवरे , पोलीस उप आयुक्त , परिमंडळ १ पुणे शहर , सतिश गोवेकर , सहाय्यक पोलीस आयुक्त , फरासखाना विभाग , पुणे. विष्णु ताम्हाणे , वरिष्ठ पोलीस निरीक्षक , समर्थ पो.स्टे , उल्हास कदम , पोलीस निरीक्षक , ( गुन्हे ) यांचे मार्गदर्शनानुसार सहा . पोलीस निरीक्षक संदीप जोरे , पोलीस अंमलदार सुमित खुट्टे , निलेश साबळे , संतोष काळे , सुशील लोणकर , सुभाष पिंगळे , सुभाष मोरे , श्याम सुर्यवंशी , हेमंत पेरणे , विठ्ठल चोरमले , यांनी केली आहे .