पुणे, दि.१२ :- पुणे शहरातुन तडीपार केले असतानाही परत पुणे शहरात आलेल्या सराईत गुन्हेगाराला समर्थ पोलीस ठाण्याच्या पथकाने अटक केली आहे.सुशांत ऊर्फ मट्या शशिकांत कुचेकर (वय 27, रा. सध्या अहमदनगर, मुळ रा. राजेवाडी, नाना पेठ) असे या तडीपार गुंडाचे नाव आहे.समर्थ पोलीस ठाण्याचे तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी हे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या अनुषंगाने हद्दीत पेट्रोलिंग करीत होते.यावेळी पोलीस अंमलदार सुमित खुट्टे यांना तडीपार गुंड मट्या हा निशांत टॉकीजसमोर रस्त्यावर थांबला असल्याची गोपनीय माहिती मिळाली त्यानुसार वरिष्ठ अधिकार्यांना याची माहिती सांगून पोलीस पथकाने निशांत टॉकीजसमोर जाऊन सुशांत कुचेकर याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असताना त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.
सुशांत कुचेकर याला 20 डिसेंबर 2019 रोजी 2 वर्षांकरीता पुणे शहर व जिल्ह्यातून तडीपार केले होते. तडीपारीच्या आदेशाचा भंग केल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली . सदरची कामगिरी ही डॉ. संजय शिंदे , अपर पोलीस आयुक्त ,पश्चिम प्रादेशीक विभाग , पुणे शहर , श्रीमती प्रियंका नारनवरे , पोलीस उप आयुक्त , परिमंडळ १ पुणे शहर , सतिश गोवेकर , सहाय्यक पोलीस आयुक्त , फरासखाना विभाग , पुणे . विष्णु ताम्हाणे , वरिष्ठ पोलीस निरीक्षक , समर्थ पो.स्टे , उल्हास कदम , पोलीस निरीक्षक , ( गुन्हे ) यांचे मार्गदर्शनानुसार सहा . पोलीस निरीक्षक संदीप जोरे , पोलीस अंमलदार सुमित खुट्टे , विठ्ठल चोरमले , संतोष काळे , सुशील लोणकर , सुभाष पिंगळे , हेमंत पेरणे , सुभाष मोरे , निलेश साबळे , सुनिल हासबे . ) नितीन घोसाळकर , श्याम सुर्यवंशी , मपोना वनिता गोरे , यांनी केली आहे .