अनेकांनी फसवणूक केल्यानंतरही नितीन पारवेंची निर्मिती क्षेत्रात ‘कानन’ चित्रपटाच्या माध्यमातून दणदणीत एंन्ट्री
नवी सांगवी,दि.१२ :- पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृह येथे शिवाजी फिल्म प्रोडक्शन निर्मित ‘कानन’ चित्रपटाचे पोस्टर आज दि.१२रोजी सायंकाळी ७ वाजता प्रकाशन सोहळा तसेच ‘कानन’- २’ चित्रीकरणाचा शुभारंभ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या उद्घाटन अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, ज्येष्ठ सिने अभिनेते जयराज नायर यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी सैराट फेम सिने अभिनेते सुरेश विश्वकर्मा, सिने अभिनेते पांडुरंग भारती, सिने अभिनेते तसेच निर्माते दिग्दर्शक नितीन पारवे, सिने अभिनेत्री कोमल श्रीसुंदर, सिने अभिनेते हनुमंत लिंमगिरे, अखिल भारतीय मराठी चित्रपट व्यवस्थापक उमेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते ‘कानन’ चित्रपटाचे पोस्टर प्रकाशन करण्यात आले. तसेच ‘कानन’- २’ चित्रीकरणाचा शुभारंभाची घोषणा करण्यात आली. यावेळी उपस्थित श्रोत्यांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली.
मनोगत
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले म्हणाले प्रतिकुल परिस्थती मधून चित्रपटाची निर्मिती केली आहे. अनुभव नसतानाही यशस्वी चित्रपट निर्माण करणे, त्यातून बोध घेणे ही अभिमानास्पद बाब आहे. आमची अशा नव्याने उभारी घेणाऱ्या तरुण निर्मात्यांना सदैव साथ राहील. या चित्रपटासाठी माझ्या मनापासून शुभेच्छा.