पुणे,दि.१२:- पत्नी, मेव्हणा, मेहुणी व सासरे यांच्या कुटुंबाकडून होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून पतीने आत्महत्या केल्या. याप्रकरणी पत्नीसह चार जणांवर मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 4 डिसेंबर रोजी पुण्यात घडला आहे.सौरभ झा (वय 31) असे आत्महत्या करणाऱ्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी सौरभची आई श्यामल किशोर झा (वय 59, रा. लोहगाव, पुणे) यांनी रविवारी (दि.11) मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. पोलिसांनी सौरभ याची पत्नी, मेव्हणा, मेहुण्याची पत्नी आणि सासरे (सर्व रा. बिहार) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी यांच्या मुलाला आरोपींनी पैशासाठी आणि बेंगलोर येथे फ्लॅट घेण्यासाठी तगादा लावला होता.तसेच आरोपींनी फिर्यादी यांच्या मुलाला शिवीगाळ करून हाताने मारहाण केली होती.यामुळे त्याचे मानसिक संतुलन बिघडले होते. पत्नी आणि तिच्या कुटुंबाकडून होणाऱ्या त्रासाला वैतागून फिर्यादीयां
च्या मुलाने 4 डिसेंबर रोजी आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यू नोंद केली होती.
फिर्यादी यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.