पुणे,दि.१९ :- फिर्यादी आणि त्यांचे कामगार मित्र यांचे जबरीने चोरुन नेलेले चार मोबाईल फोन, रोख रक्कम, आधार कार्ड आणि गुन्हयात वापरलेली मोटार सायकल चोरने, अशा चोरीच्या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगारास शिवाजी नगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. पोलिसांनी त्याच्याकडून मोबाईल फोन, रोख रक्कम, आधार कार्ड आणि गुन्हयात वापरलेली मोटार सायकल जप्त केले. १) श्रीकांत भरत कदम, वय-३२ वर्ष, रा. हेल्थ कॅम्प चाळ नं. ५,पांडवनगर पुणे आणि २) सुरज राजु धोत्रे, वय-३२ वर्ष, रा. ८८३, जुनी वडारवाडी, वडार वाडी, पुणे असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर पोलीस ठाणे पुणे शहर येथे गुन्हा रजि. नं. १९९/२०२२ भादवि कलम ३९२, १७०, ३४ प्रमाणे दाखल गुन्ह्यातील आरोपींचा शोध तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक, भोलेनाथ अहिवळे हे पोलीस पथकासह घेत असताना, सहा. पोलिस फौज. अविनाश भिवरे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, दाखल गुन्हयातील जबरी चोरी करणारे इसम हे शनी मंदिर, वडारवाडी येथे थांबले आहेत.
सदर ठिकाणी बातमीदाराने सांगितलेले वर्णनाचे इसम यांना त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केल्यानंतर त्याने त्याच्याकडील मोबाईल फोन, रोख रक्कम, आधार कार्ड चोरल्याची कबुली दिली एकुण ६५,५००/- किंचा मुददेमाल ताब्यात घेवुन शिवाजीनगर पोलिस ठाणेकडील गुन्हा रजि.नं.१९९/२०२२, भादवि कलम ३९२, १७०, ३४ हा गुन्हा दोन तासांच्या आत उघडकीस आणला आहे.सदरची कामगिरी.अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे, रंजनकुमार शर्मा शहर (अति. कार्यभार पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर), पोलीस उपायुक्त, परि- ०१, पुणे शहर, संदीपसिंह गिल्ल. सहा. पोलीस आयुक्त विश्रामबाग विभाग, पुणे शहर,सतीश गोवेकर तसेच शिवाजीनगर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे), विक्रम गौड, सहा. पोलीस निरीक्षक, भोलेनाथ अहिवळे, पोलिस उप-निरिक्षक, अर्जुन नाईकवाडे, पोलीस अंमलदार, अविनाश भिवरे, गणपत वाळकोळी, बशीर सय्यद, रणजित फडतरे, सुरेंद्र साबळे, सतीश खुरंगे, आदेश चलवादी यांनी केलेली आहे.