पिंपरी, दि.२० :- कचऱ्यापासून खत निर्मिती, ई वेस्ट आणि कच-याचा पुनर्वापर याविषयी सविस्तर माहिती देणारे प्रदर्शन महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आले असून त्याचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने चिंचवड येथील अॅटो क्लस्टर २० ते २२ जानेवारी या कालावधीत घनकचरा विषयक सविस्तर माहिती देणारे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे, त्याचे उद्घाटन अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी जांभळे पाटील यांनी प्रदर्शनाच्या स्टॉल्सला भेट देऊन पाहणी केली.
प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी सह शहर अभियंता संजय कुलकर्णी, उप आयुक्त अजय चारठणकर, मनोज लोणकर, रविकिरण घोडके, क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, अण्णा बोदडे, उमाकांत गायकवाड, शितल वाकडे, विजयकुमार थोरात, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, क्षेत्रिय कार्यालयातील सर्व सहाय्यक आरोग्याधिकारी, बिल्डर असोसिएशनचे संजीवन सांगळे, दत्तात्रय देशमुख, व्ही एम संस्थेचे संचालक जितेंद्र पाटील, युनिट्रेक मीडियाचे व्यवस्थापक प्रशांत घाडगे, प्रतिभा घाडगे, कविता पवार, विक्रम वारणकर पर्यावरण विभागाच्या उपअभियंता सोहन निकम, मोराणकर तसेच विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी प्रतिनिधी नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर प्रदर्शनात महानगरपालिकेचे तसेच जेईनम फुड ऍन्ड वेस्ट प्रोजेक्ट प्रा.लि., विनटेक स्क्वेअर प्रा.लि., इनरिच टेक, ग्रीनेरीया रिन्युएबल टेक्नॉलॉजीस, कन्सेप्ट बायोटेक, सिरीअस इन्व्हायरोन्स एलएलपी, देव बायोफयुअल, बायोगॅस, फिनटेक लाईफ ट्रु टेक्नॉलॉजीस प्रा.लि., अर्थकेअर इक्वीपमेंट प्रा. लि, इन्व्हीकेअर टेक्नॉलॉजीस प्रा. लि., श्रीजी एक्वा ट्रीटमेंट प्रा. लि. कला जनसेट प्रा. लि., लिमरस सस्टेनेबल सोल्युशन, पिंपरी चिंचवड महानगरपालिका एसटीपी आणि आरोग्य व स्वच्छ भारत अभियान कक्ष, व्ही. क्वालिटी इलेक्ट्रोमेक प्रा. लि., पिसिसीआयसीएसए, रेडडो नेच्युरा इंडिया प्रा. लि., फयुराट वुलार हायड्रोटेक एलएलपी, जलसेवक सोल्युशन्स, इन्फीनिटी हायड्रोलिक्स, चक्र आकार लाईफस्टाईल सोल्युशन्स, एचएनबी इंजिनिअर्स पीटी लि., स्मार्ट एन्व्हायरो सिस्टम प्रा. लि., साईरुपम टेक्नॉलॉजिस, सॉल्व्हअर्थ इकोटेक प्रा. लि., ग्रीन सृष्टी फाउंडेशन, मेडा, पुणे डिस्ट्रीक्ट हाऊसिंग फेडरेशन, सायनर्जी मेटेरिया, इकोसेन्स ग्रीन सोल्युशन्स एलएलपी, क्लीन ओ अर्थ, पुर्णम इकोव्हीजन फाऊंडेशन, संजिवनी डिजास्टर सोल्युशन्स, कॉन्टीप्रो इंडस्ट्रीज या संस्थांचे माहिती व प्रात्यक्षिक सादर करणारे स्टॉल आहेत.