पुणे,दि.११:-पुणे शहर खडकी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दि.८ रोजी स.पो.नि. वालकोळी, स.पो.नि. कदम, व अंमलदार पेट्रोलिंग करीत असताना क्रिस्टल रॉयल सोसायटी खडकी या ठिकाणी एक मुलगी एकटी फिरत असल्याने एका नागरिकाला शंका आल्याने त्यांनी पोलिसांना कळवले व सदर ठिकाणी महिला पोलीस अधिकारी सपोनि वालकोळी यांना सदर प्रकरणी सुचना दिल्या.व सदर मुलीला तिचे नांव विचारले असता, तिने तिचे नाव समारा अवस्थी सोंगाला वय १३ वर्ष रा. तेलंगना असे सांगितले. व मुलीला सुरक्षिततेच्या दृष्टीने खडकी पोलीस स्टेशनला घेवुन गेले. मुलीकडे अधिक विचारपुस करता ती सुरवातीला उडवा उडवीचे उत्तर देत होती. तिला पोलिसांनही विश्वासात घेवुन अधिक तपास करता तिने तिच्या पालकांचे नाव व पत्ता सांगितल्याने तेलंगना पोलीस नियंत्रण कक्ष येथे संपर्क साधुन सदर मुलीने सांगितलेल्या पत्यावरुन तिची माहीती मिळवता तेलंगना पोलीस नियंत्रण कक्ष यांनी सदरचा पत्ता हा तेलंगना मधील पेठ नशिराबाद पोलीस स्टेशन चे हद्दीमधील आहे असे कळविले.
त्या अनुषंगाने सपोनि बालकोळी यांनी पेठ नशिराबाद पोलीस स्टेशन, राज्य तेलंगणा येथे दुरध्वनी व्दारे संपर्क साधुन सदर मुलीबाबत चौकशी केली असता त्यांनी सदर मुलीबाबत पेठ नशिराबाद पो. स्टे. गु. रजि.नं. १२४/२०२३ भादंवि कलम ३६३ प्रमाणे दि ०५ रोजी गुन्हा दाखल असल्याचे समजले. त्यानंतर सदर मुलीला संरक्षणकामी बालकल्याण संस्था समिती येरवडा पुणे यांचे आदेशाने सेंट क्रिस्टल संस्था कर्वे रोड पुणे येथे ठेवण्यात आले. व
दिनांक ०९ रोजी सदर मुलीचा सखा भाऊ नामे सोगाला आर्यन गुप्ता व पेठ नशिराबाद पोलीस स्टेशन तेलंगना येथील पोलीस अंमलदार १०९७३ ए.डी. हर्षद पाशा हे खडकी पोलीस स्टेशन येथे आल्यानंतर सदर मुलीला बाल कल्याण समिती येरवडा पुणे यांचे लेखी आदेशाने त्यांचे सुखरुप ताब्यात दिले आहे. सदरची कारवाई रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त. पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, शशिकांत बोराटे, पोलीस उप आयुक्त. परिमंडळ, ४, आरती बनसोडे, सहा पोलीस आयुक्त खडकी विभाग, पुणे शहर, विष्णु ताम्हाणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक खडकी पोलीस स्टेशन पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली, सहा पोलीस निरीक्षक श्रीमती शारदा वालकोळी, पोलीस उप निरीक्षक वैभव मगदुम, परिविक्षाधीन पोलीस उप निरीक्षक संतोष भांडवलकर, म.पो.शि. सुपे, म.पो.शि. जगताप. पो.शि. अहिवळे यांनी केलेली आहे