पुणे,दि.१०:- पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने पुण्यात मोठा शस्त्र साठा जप्त केला आहे व १७ गावठी पिस्टल व १३ जिवंत काडतुसांसह ७ आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी पिस्टल विक्री करणाऱ्या असल्याची माहिती पुणे शहर अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -१ सुनिल पवार, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-२ नारायण शिरगांवकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रजनिश निर्मल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पिस्टल विक्री करणारे हनुमंत अशोक गोल्हार (वय-२४ रा. मु.पो. जवळवाडी ता. पाथर्डी जि. अहमदनगर), प्रदिप विष्णू गायकवाड (वय-२५ रा. मु.पो. ढाकणवाडी ता. पाथर्डी मुळ रा. नगर रोड, चहाट फाटा, ता.जि. बीड) पिस्टल विकत घेणारे अरविंद श्रीराम पोटफोडे (वय-३८ रा. अमरापुरता शेगाव जि. नगर) शुभम विश्वनाथ गरजे (वय-२५ रा. मु.पो. वडुले, ता. नेवासा जि. नगर), ऋषिकेश सुधाकर वाघ (वय-२५ रा. मु.पो. सोनई ता. नेवासा), अमोल भाऊसाहेब शिंदे (वय-२५ रा. मु.पो. खडले परमानंद ता. नेवासा), साहिल तुळशीराम चांदेरे उर्फ आतंक (वय-२१ रा. वरची आळी, बालमित्र मंडळाजवळ,सुसगाव) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पुणे शहरामध्ये अवैधरित्या पिस्टल बाळगणाऱ्या तसेच विक्री करणाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठांकडून देण्यात आले होते. त्यापार्श्वभूमीवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून हद्दीमध्ये पेट्रोलींग व गुन्हेगार चेकिंग मोहिम राबवण्यात आली. या मोहिमेत गुन्हे शाखा युनिट सहाच्या पथकाने २५ फेब्रुवारी रोजी पिस्टल विक्री करणारे दोघे हे वाघोली येथील नानाश्री लॉज समोर आल्याची माहिती मिळाली होती.
मिळालेल्या माहितीच्या आधारे युनिट सहाच्या पथकाने सपाळा रचून हनुमंत गोल्हार, प्रदिप गायकवाड यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे असलेल्या महिंद्रा कारची झडती घेतली असता 1 गावठी पिस्टल व २ जिवंत काडतुसे मिळाली. पोलिसांनी कार, पिस्टल व काडतुस जप्त करुन आरोपींवर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन अटक केली.
पोलिसांनी आरोपींची पोलीस कस्टडी घेऊन सखोल चौकशी केली. त्यावेळी हनुमंत गोल्हार हा ए.पी.एम.सी पोलीस स्टेशन नवी मुंबई येथील दरोड्यातील आरोपी असून पोलीस त्याचा शोध घेतल असल्याची माहिती समजली. तसेच पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात त्याच्यावर आर्म अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला असून या गुन्ह्यात पाहिजे आरोपी असल्याचे समजले.
आरोपीकडे अधिक चौकशी केली असता अनधिकृत पिस्टल विक्री करणारे तसेच त्यांच्याकडून पिस्टल विकत घेणारे अरविंद पोटफोडे, शुभम गरजे, ऋषिकेश वाघ, अमोल शिंदे यांना अटक केली. पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी छापा टाकून १३ गावठी पिस्टल ४ काडतुसे तसेच एक महिंद्रा कार, मोबाईल मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ
पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -१ सुनिल पवार, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-२ नारायण शिरगांवकर
यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट -६ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रजनिश निर्मल
युनिट -१ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले
सहायक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर, पोलीस उपनिरीक्षक अजय जाधव, सुनिल कुलकर्णी,
उप-निरीक्षक सुरेश जायभाय, भैरवनाथ शेळके, पोलीस अंमलदार मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडकर, रमेश मेमाणे,
कानिफनाथ कारखेले, बाळासाहेब सकटे, प्रतिक लाहीगुडे, नितीन मुंडे, मोहीते, ऋषिकेश ताकवणे,
ऋषिकेश व्यवहारे,ऋषिकेश टिळेकर, सचिन पवार, नितीन धाडगे, अश्पाक मुलाणी, ज्योती काळे, सुहास तांबेकर,
अमोल पवार, इम्रान शेख, आण्णा माने, आय्याज दड्डीकर, महेश बामगुडे, विठ्ठल साळुंखे, निलेश साबळे,
शुभम देसाई, दत्ता सोनवणे यांच्या पथकाने केली.