पुणे,दि, ३० :- पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दि,३० रोजी जिल्हास्तरीय माध्यम देखरेख नियंत्रण कक्षास (मिडीया सेंटर) भेट देऊन पहाणी केली. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग तसेच झुंजार न्युज चॅनेल संपादक संतोष राम काळे सकाळचे गजेंद्र बडे, शिरीष रणदिवे व ईतर माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्ह्यातील माध्यम प्रतिनिधींना लोकसभा निवडणुकीविषयीची माहिती या कक्षातून दिली जाणार असून जिल्हाधिकारी राम यांनी तेथील सेवा-सुविधांची पहाणी केली