पुणे दि ११ :- पुणे शहर पोलिस महिला पोलिसांच्या दामिनी पथकाची . कामगिरी कौतुकास्पद आहे, अशा शब्दात अभिनेत्री मृणाल देव-कुलकर्णी यांनी काल बुधवारी या पथकाचे कौतुक केले.महिलांच्या सुरक्षेसाठी सुरू करण्यात आलेल्या पोलिसांच्या दामिनी पथकाला ४ वर्ष पूर्ण झाली. त्या निमित्ताने पोलीस आयुक्तालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्या
बोलत होत्या.सदर पथकात ३३ महिला कार्यरत असून यांचा एक बीट मार्शल आहे. अशा एकूण १५ बीट मार्शल आहेत. यातून महिलांच्या छेडछाडीला आळा घालणे, खाजगी कंपनीत काम करणार्या महिलांना त्यांच्या कायद्याबाबत माहिती देणे, स्वयंसुरक्षेबाबत मार्गदर्शन आदी कामं केली जातात. या पथकामार्फत हरवलेल्या मुलीना त्यांच्या पालकांच्या हवाली करणे, गर्दीच्या ठिकाणी महिलांचे दागिने चोरी रोखण्यासाठी
आरोपीस पकडणे, फीट आलेल्या रिक्षाचालकास वेळीच केलेली मदत, मिळून आलेल्या अर्भकास वैद्यकीय मदत आदी कामं केली. तसेच आत्महत्या करू इच्छिणार्या महिलांचे समुपदेशन, महिलांसंबंधी गुन्हे उघडकीस आणण्यास मदत अशी अनेक कामं केली आहेत पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अतिरिक्त आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक आयुक्त भानुप्रताप बर्गे
पोलिस निरीक्षक विजया कारंडे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती केदार, पोलीस उपनिरीक्षक प्रिया टिळेकर आदी या प्रसंगी उपस्थित होते. दामिनी पथकातील सात महिला पोलीस
कर्मचाऱ्यांचा सत्कार या वेळी करण्यात आला.समाजात एखादी घटना घडली, की आपण फक्त त्या घटनेकडे त्रयस्थ म्हणून पाहतो. समाजाचा आपण भाग आहोत म्हणून घटनेकडे पाहत नाही. महिला पोलिसांचे काम अवघड असते. कौटुंबिक जबाबदारी सांभाळून त्या काम करतात. समाजातील गैरप्रकारांना आळा घालणे, महिलांची छेड काढणाऱ्यांवर कारवाई करणे अशी कामे दामिनी पथकाकडून कारवाई करण्यात येतात ही कामगिरी कौतुकास्पद आहे, असे मृणाल देव-कुलकर्णी यांनी सांगितले. डॉ. वेंकटेशम म्हणाले, एखाद्या गुन्ह्य़ात महिला तक्रारदार असेल, तर तपासावर विशेष लक्ष ठेवण्यात येते. अशा गुन्ह्य़ांच्या तपासासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे. कागदपत्रे तसेच पुराव्यांचे योग्य पद्धतीने संकलन करण्याचे काम त्यांच्यावर सोपविण्यात आले आहे.दामिनी पथकाची कामगिरी दामिनी पथकातील महिलांकडून शहरातील शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात गस्त घालण्यात येते. शाळा, महाविद्यालयांच्या परिसरातील सडक सख्याहरींवर कारवाई करण्यात येते. ज्येष्ठ महिला तसेच पुरुषांकडून तक्रारी आल्यास त्यांना तातडीने मदत उपलब्ध करून देण्यात येते. एखाद्या भागात गैरप्रकार आढळून आल्यास त्वरित कारवाई करण्याचे काम या पथकाकडून केले जाते. चार वर्षांपूर्वी या पथकाचे कामकाज सुरू करण्यात आले होते.