पुणे दि,२०:- महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, पर्यटक निवास पानशेत येथे ग्रामीण व जबाबदार पर्यटनाच्या माध्यमातुन शेतक-यांचे सबलीकरण अंतर्गत शनिवार दि०६ रोजी पर्यटन विकास महामंडळा मार्फत पर्यटक निवास पानशेत या परिसरामध्ये भात लावणी महोत्सव आयोजित करण्यात आला.हा भात लावणी महोत्सव पानशेत येथील कुरण गावामध्ये शेतकरी संतोष भाऊ ठाकर यांच्या शेतामध्ये करण्यात आला. या महोत्सवा मध्ये मोठ्या प्रमाणावर पर्यटकांनी सहभाग घेतला. भात लावणी महोत्सवाच्या माध्यमातुन पर्यटकांना भात लावणीची माहिती
अवगत करण्यात आली. व यातुन पर्यटकांना वेगळाच आनंद मिळाला. हा महोत्सव साजरा करत असताना पर्यटकांकडुन शेतक-यांकरीता प्रति व्यक्ती रु. ५०/- प्रमाणे मदत करण्यात आली. या वेळेस पर्यटकांनी शेती व शेतक-यांविषयी आपले अनुभव व मनोगत व्यक्त
केले. या भात लावणी महोत्सवाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक निवासात येणा-या पर्यटकांना आपली सहल, पर्यटक निवासाची भेट अविस्मरणीय व मनोरंजनपूर्ण झाली. या भात लावणी विषयी पर्यटकांमध्ये आवड निर्माण व्हावी हा महामंडळाचा
मानस असुन हा भात लावणी महोत्सव दरवर्षी साजरा करण्यात येणार आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे मा.
उपमहाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल, नियंत्रण अधिकारी तथा विभागीय पर्यटन अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पर्यटक निवास व्यवस्थापक श्री. वैभव पाटील व सर्व
कर्मचारी यांच्या कृतितून हा महोत्सव साकार करण्यास परिश्रम घेण्यात आले.