बिलोली दि,२२:- आपल्या पाल्यावर संस्कार करीत असताना ” आई ” ने दैनंदिन जीवनात घेतलेल्या परिश्रमाची सर्वचजन आठवण ठेवतात.पण आपल्या पाल्याच्या उद्धारासाठी ” आई ” प्रमाणे बापही तेवढेच परिश्रम घेतो माञ बापाने घेतलेले परिश्रमाचे महत्त्व पाल्याला कळत नाही. बाप हा नेहमीच दुर्लक्षीत राहीला आहे. बाप म्हणजे पाण्यातील मासा असून त्याचे अश्रू कोणाला दिसत नाहीत.असे प्रतिपादन आ.सुभाष साबणे यांनी केले.ते कै.बसवंतराव मुंडकर यांच्या पुण्यस्मर्णार्थ आयोजित ” बाबा तुमच्यासाठी ….!” या कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी बोलत होते.
यावेळी व्यासपिठावर माजी आमदार गंगाराम ठक्करवाड, सेवानिवृत्त शिक्षक शामराव जोशी इनामदार , धर्माबाद चे माजी नगराध्यक्ष विश्वनाथराव पा.बन्नाळीकर,युवा सेनेचे जिल्हा प्रमुख विक्रम साबणे, सेवानिवृत्त अधिकारी वैजनाथराव मेघमाळे,सेवा सहकारी सोसायटीच्या जेष्ठ संचालीका श्रीमती भागरथबाई ब.मुंडकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.पुढे बोलताना आ.साबणे म्हणाले सध्याच्या आधूनिक युगात युवकांमध्ये आई वडिलांपेक्षा मोबाईल,वाहन आदी भौतिक सुख सुविधांना आत्याधिक महत्त्व प्राप्त झाले . घरात आई – वडील नसतील तर चालेल पण चार चाकी वाहनाची तरूणांना अधिक गरज वाटत आहे. जो पाल्य आपल्या आई वडीलांची सेवा करतो त्या घरातील नेहमीच सुख शांती व लक्ष्मी वास असतो.सध्याच्या सोशल मिडीयाच्या युगात व्हाट्सअप सारख्या सोशल साईड वरून बिनकामाच्या संदेशाची आदान प्रदान होत आसताना गोविंदराव मुंडकर यांच्या संकल्पनेतुन व्हाट्सपवर तयार करण्यात आलेल्या बाबा तुमच्यासाठी…! या ग्रूपच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात बापा विषयीच्या माहितीचे व बापाच्या महत्वाविषयीचे संदेश प्रसारीत झाल्यामुळे महाराष्ट्रात मोठी आणि पहिली चळवळ उभी राहीली.बापा विषयी मुंडकर यांनी उभारलेल्या चळवळीची प्रेरणा घेऊन पाल्यांनी आपल्या वडीलांच्या नावे एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचे अवाहन आ.साबणे यांनी उपस्थीतांना केले.बाप या विषयावर कार्यक्रमाचे अध्यक्ष शामराव जोशी इनामदार सर, नागनाथ ईळेगावे,दत्ता पा.हांडे,शंकर मावलगे,बन्नाळीकर,कु.ऐश्वर्या मुंडकर यांनी आपले विचार मांडले.तर बबा तुमच्यासाठी…! या कार्यक्रमाचे संयोजक पञकार गोविंद मुंडकर यांनी प्रास्तविकात बाप या विषयावर सखोल असे विचार प्रगट करून या कार्यक्रमाचा उद्देशाची माहिती दिली.यावेळी राष्ट्रसंत शिवलींग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांना भारतातील सर्वोच्च असा भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी केल्याबद्दल समाज बांधवांच्यावतीने श्री विश्वनाथराव पा.बन्नाळीकर यांच्या हस्ते आ.सुभाषराव साबणे यांचा जंगी सत्कार करण्यात आला.