बोरघर / माणगांव.दि,२१:- बहुजन प्रतिपालक, रयतेचे कल्याणकारी राजे, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि मानवतावादी समतेची उत्तुंग विचारधारा देणारे, भारतीय घटनेचे एकमेव शिल्पकार विश्व रत्न बोधिसत्व महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्या दोन महामानवांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक महाड नगरीत शिवसंग्राम संघटनेचे रायगड जिल्हा सदस्य नोंदणीचा शुभारंभ सोहळा अतिशय उत्स्फुर्तपणे पार पडला. यावेळी विविध थरांतील सर्व बहुजन समाज बांधवांनी, अनेक क्षेत्रांतील मान्यवर, तरुण तरुणी, अनेक समाज प्रमुख ह्या सर्वांनी दाखविलेली उपस्थिती ही या जिल्हा सदस्य नोंदणी अभियानाचे निर्भेळ यश आणि पुढील जबाबदारी आहे असे नम्र प्रतिपादन जिल्हाध्यक्ष श्री. अविनाश सावंत यांनी कार्यक्रमानंतर केले आहे.
शिवसंग्रामचे जिल्हा चिटणीस तथा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे संचालक अनंत देशमुख आणि शिवसंग्राम पेण तालुका अध्यक्ष तथा कोकण म्हाडा महामंडळाचे संचालक सुनील (आप्पा) सत्वे यांच्या विशेष पुढाकाराने आयोजित करण्यांत आलेल्या ह्या सदस्य नोंदणी अभियान जिल्ह्यातील भावी सामाजिक संघटन वाढीसाठी आणि अनेकविध प्रकारे लोकोपयोगी कामांसाठी फार उपयुक्त ठरणार असल्याचेही श्री. सावंत यांनी ह्यावेळी सांगितले.कार्यक्रमाच्या सुरुवातीस छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यांत आले. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेस आलेल्या विविध मीडियाच्या पत्रकारांसमोर जिल्हाध्यक्ष श्री. सावंत यांनी अनेक प्रश्नांना समर्पक उत्तरे देऊन जिल्हातील भावी संघटन कसे असेल याचेही समर्पकपणे विवेचन केले.
प्रतिनिधी व छाया : विश्वास गायकवाड बोरघर / माणगांव )