पुणे दि.२२:-पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी शनिवारी (दि.20) शहाजीनगर व लाखेवाडी येथील जनावरांच्या चारा छावणीस भेट देऊन शेतक-यांशी संवाद साधला व त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या.
निरा भिमा साखर कारखान्याच्या शहाजीनगर येथील कार्यस्थळावरील छावणीमध्ये 1755 व भवानीगड विकास प्रतिष्ठानच्या लाखेवाडी येथिल छावणी मध्ये 2250 जनावरे दाखल आहेत.इंदापूर तालुक्यात दुष्काळी परिस्थितीमुळे जनावरांसाठी चा-याची व पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे.त्यामुळे पशुधन वाचविणे ही आपना सर्वांचीच जबाबदारी आहे,असे मत छावणी भेटीप्रसंगी अंकिता पाटील यांनी व्यक्त केले.
या चारा छावण्यांमुळे शेतक-यांना मोठा दिलासा मिळाला आहे.आगामी काळात तालुक्यात चांगला पाऊस होऊन सर्वजण सुखी-समाधानी व्हावेत,असा आशावादही यावेळी अंकिता पाटील यांनी बोलताना व्यक्त केला.
निरा भिमा कारखान्याच्या शहाजीनगर छावणी भेटी प्रसंगी कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, उपाध्यक्ष कांतिलाल झगडे, माजी जि.प.सदस्य श्रीमंत ढोले,तानाजीराव देवकर,दादासाहेब घोगरे,सतीश अनपट, नामदेव किरकत,अनिल चव्हाण, कार्यकारी संचालक धीरजकुमार माने, अधिकारी, कर्मचारी,ग्रामस्थ उपस्थित होते.तर लाखेवाडी छावणी भेटीप्रसंगी भवानी गड विकास प्रतिष्ठापनचे अध्यक्ष श्रीमंत ढोले, उपाध्यक्ष चिञलेखा ढोले यांनी अंकिता पाटील यांना छावणी माहीती दिली.यावेळी शेतकरी, ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, निरा भिमा कारखान्याच्या वतीने शहाजीनगर, शिरसटवाडी व खोरोची या तीन ठिकाणी छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. शिरसटवाडी येथील छावणीत 1285 व आजच सुरू झालेल्या खोरोची येथील येथील छावणीत 650 जनावरे दाखल असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक धीरजकुमार माने यांनी दिली.