.शिवसेना पक्षप्रमुख मा,उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसाचं (दि.२३ जुलै)औचित्य साधून प्रेरणा दिवस म्हणून वृक्षारोपण केले. हा कार्यक्रम महाजन गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ,तलवाडा ता.विक्रमगड येथे संपन्न झाला.या वेळी प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक व श्री संजय पाटील पालघर माध्यमिक शिक्षक सेना अध्यक्ष यांनी उपस्थित राहून पर्यावरणाची झालेली हानी व त्यावर उपाययोजना या विषयी मार्गदर्शन केले.तसेच श्री बाळासाहेब कांबळे सरांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणामधे पर्यावरणाचे महत्व सांगून वृक्ष लागवडीचे सखोल मार्गदर्शन केले.या कार्यक्रचे प्रास्तविक विद्यालयाचे प्राचार्य मा.अरुण भोईरसर यांनी केले.या प्रसंगी मा.श्री चंद्रकांत राऊत कार्यालय प्रमुख ,श्री अहिरे सर ,संतोष मर्दे सर ,वश्री शशिकांत पाटील तालुका अध्यक्ष डहाणू ,,श्रीकिशोर.लिधुरे सर,व पालघर जिल्हा शिक्षक सेने सर्व पदाधिकारी ,सदस्य व महिला वर्ग उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री अरुण भोईर सर यांनी सातशे वृक्ष लावण्याचा संकल्प जाहीर करण्यात आला आहे विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभागी घेतला