.्रोटरी क्लबऑफ डहाणू व जिल्हा क्रीडा अधिकारी पालघर यांच्या तर्फेकार्डिनल पिमेंटा आदिवासी हायस्कुल वरखंडा येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. या प्रसंगी पालघर जिल्हा क्रीडाधिकारी शरद कलावंत व प्रकाश वाघ आणि रोटरी क्लब ऑफ डहाणू चे नवनिर्वाचित अध्यक्ष योगराज शिरसाठ व माजी अध्यक्ष अविनाश फाटक यांनी विद्यार्थ्यांना वृक्षलगवडीचे महत्व या विषयावर मार्गदर्शन केले.या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर ज्युलि, राज्य आदर्श शिक्षक जयंता पाटील, क्रीडा शिक्षक पुंडलिक पाटील आणि सहकारी शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.