रायगड.जिल्ह्यात सर्व प्रथम माणगांव पोलीस ठाणे येथे सोमवार दि. २९ जुलै २०१९ रोजी संध्याकाळी ५.३० वाजता महीला हिरकणी कक्ष तसेच त्यांच्या समुपदेशनासाठी स्वतंञ कक्षाची स्थापना पोलीस अधिक्षक रायगड अलिबाग अनिल पारसकर यांच्या आदेशानुसार तसेच माणगांव पोलीस ठाणे उपविभागिय पोलीस अधिकारी शशिकिरण काशीद यांचे मार्गदर्शनानुसार
पोलीस निरीक्षक रामदास इंगवले यांचे संकल्पनेतुन हा महीला हिरकणी कक्ष रायगड जिल्ह्यात मध्ये एकमेव पणे सुरू करण्यात आलेला आहे.सदर उपक्रमा अंतर्गत तालुक्यात महीलांवर होणारे अन्याय अत्याचार.बालकांवर होणारे अत्याचार यांसदर्भात कडक कारवाई करण्या करीता सदर कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.तसेच भविष्यात या पुढ महिलांवर अन्याय अत्याचार झाले तर याच्या माध्यमातून संबंधितांवर कडक कारवाई करण्या करीता सदर कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.महीलांनी माणगांव पोलीस ठाणे येथे आपल्या अडीपडचणी विषयी महीला पोलीस उपनिरीक्षक प्रियांका बुरूंगळे यांचेशी थेट संपर्क करावा.असे आव्हान या कार्यक्रमा प्रसंगी माणगांव पोलीस
ठाण्याचे पो.निरीक्षक इंगवळे साहेब यांनी बोलताना सागीतले.सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागिय पोलीस अधिकारी शशिकिरण काशीद माणगांव तहसिलदार प्रियंका अहिरे मॅडम ,पोलीस उपनिरीक्षक प्रियंका बुरूंगळे नगराध्यक्षा योगिता चव्हाण महीला दक्षता समितीच्या सदस्या मिरजकर .शिंदे माणगांव पोलीस ठाण्याच्या महीला कर्मचारी सायली सानप, पाटील,कुंजन जाधव,सुप्रिया शिंदे, नगरपंचायतीच्या बाळकल्याण सभापती रिया उभारे,नगारसेविका माधुरी मोरे,भाग्यश्री यादव सानिया शेठ इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती.
बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड )