पुणे दि,०३ :- पुणे सातारा महामार्गावर पेट्रोलिंग करीत असताना दि ०३ रोजी सहायक पोलीस निरीक्षक श्री. डी. एम. दगडे हे त्यांचे पोलीसपथकासह पुणे सातारा महामार्गावर पेट्रोलिंग करीत असताना त्यांना रात्री ०८:३० मिनिटाच्या सुमारास खेडशिवापूर टोलनाक्यावर माहीती समजली की, एका पांढरे रंगाचे स्कार्पिओ गाडी कमांक एम. एच. १४/बी. सी. १२२७ या गाडीतील एक युवक जखमी अवस्थेत असून त्यास गाडीतील चार ते पाच तरूण काचेच्या बिअरच्या बाटलीने मारहाण करीत आहेत. ते त्यास सातारा रोड बाजूकड पळुन गेले आहेत. अशा प्रकारची माहीती समजताच सपोनि दराडे हे त्यांचे स्टाफसह सदर गाडीचा. पाटलाग करीत सातारा बाजूकडे गेले असता टोलनाक्यापासून ४ ते ५ कि. मी. अंतरावर त्याना ती गाडी दिसली.व त्यांनी त्या गाडी चालकास गाडी थांबविण्याचा इशारा केला असता त्या गाडीतील इसम हे पोलीसांच्या इशा-याला न जुमानता ते त्यांची गाडी भरधाव वेगात चालवू लागले. तसेच पोलीस पथक हे त्यांच्या मागावर होते. सदर तरूणांनी त्यांची स्कार्पिओ गाडी हायवे रोड केळवडे गावाच्या दिशेने घेतली. तरीही पोलीसांनी त्यांचा पाटलाग सुरूच ठेवला. दरम्यान ते त्या.स्कार्पिओ.गाडी बनेश्वर मंदीराचे दिशेने घेवू लागले असता सपोनि दराडे यांनी राजगड पोलीस स्टेशन कडील उपलब्ध पोलीसांना माहीती देवून बनेश्वर कमान या ठिकाणी नाकेबंदी लावण्यास सांगितली. त्याप्रमाणे राजगड पोलीसांनी बनेश्वर कमान या ठिकाणी नाकाबंदी लावली असता रात्री ९ वाजता त्या तरूणांची गाडी त्या ठिकाणी पकडली. त्यापैकी त्यातील दोघे जन अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. गाडीतील जखमी इसमास पोलीसांना, सांगितले कि माला या लोकांनी आंबेगाव.पठार.या ठिकाणाहून पळवून आणले असून मी त्यांच्या बहीणीला फोन करतो असा माझेवर संशय घेवून त्यांनी माझे डोक्यात काचेच्या बिअरच्या बाटलीने डोक्यात मारून जखमी केले असून तेआपणास जिवे ठार मारण्या करीता पाटाकडे घेवून जात असल्याचे सांगितले. त्यावर पोलीस.पथकांनी त्या गाडीतील सर्व युवकांना ताब्यात घेतले. जखमी मुलाने त्याचे नाव विशाल विठ्ठल, इंगळे वय २३ वर्ष, रा. शिवकॉलनी बस स्टॉप समोर, आंबेगाव पुणे असे सांगितले असून त्यास मारहाण करणारे तरूण १) राज उर्फ धुळा आबुराव खुटवड, वय ३२ वर्ष २) सुहास सोमाजी बडदे, वय २२ वर्ष, रा, कुडीत, ता. पुरंदर, जि. पुणे ३) अमीत संजीव तनपुरे, वय २५ वर्ष, रा.धांगवडी, ता. भोर, जि. पुणे ४) समीर बडदे, रा. कुडीत, ता. पुरंदर, जि. पुणे ५) गोटया कामथे,रा, कुडीत, ता. भोर, जि. पुणे हे असून समीर बडदे व गोटया कामथे हे दोघे पळून गेले. त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. जखमी युवकावर नसरापूर येथील सिध्दीविनायक हॉस्पीटल मध्ये प्राथमिक औषधउपचार करण्यात आले आहेत. आरोपींचे . पुढील तपास भारती विद्यापिठ पोलीस स्टेशन, पुणे शहर पोलीस करीत आहे