्निरा नरसिंहपुर दि, ०६ :- इंदापूर तालुक्यातील सराटी या ठिकाणी नागपंचमी सणानिमीताने जिजामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या वतीने दि ५व६रोजी सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमांच्या उद्घाटन करण्यांचा सन्मान इंदापुर तालुक्यातील पत्रकार बाधवांना मिळाला यावेळी इंदापुर तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार मधुकर नाना गलांडे आयबीएन लोकमत यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून या कार्यक्रमांचे उद्घाटन करण्यात आले आहे.
सोनाई समुहाचे अध्यक्ष दशरथ माने,ज्येष्ठ नेते अशोक घोगरे,त्याचबरोबर मोठ्या संख्येनी कार्यकर्ते व पालक वर्ग विद्यार्थी वर्ग उपस्थित होते दै प्रभातचे इंदापुर प्रतिनिधी निलकंठ मोहिते,दै लोकमतचे सागर शिंदे,दै पुण्यनगरीचे महेशस्वामी ,दै पुढारी रियाज मुलाणी,दै सकाळ मनोहर चांदणे,दै जनप्रवास काकासाहेब मांढरे,दै सकाळ इंदापुर डॉ संदेश शहा,दै सकाळ बावडा दिपक शिंदे,दै बावडा लोकमतचे पत्रकार उमाकांत तोरणे,दै तुफान क्रांती बाळकडू पत्रकार गणेश कांबळे, दै बाळकडू इंदापुर प्रतिनिधी सुरेश मिसाळ, दै लोकमंथन चे पत्रकार शैलेश काटे,दै प्रभात पुण्यनगरीचे पत्रकार संदिप सुतार, दै सकाळ शौकत तांबोळी ,दै प्रभात बाळासाहेब सुतार तर इलेक्ट्रॉनिक माध्मातुन राहुल ढवळे एबीपी माझा, जावेद मुलाणी
झी २४तास ,मधुकर नाना गलांडे आयबीएन दैनिक सकाळ आदम पठाण लोकमत,काकासाहेब पांढरे जनप्रवास लाईव्ह,गणेश कांबळे आधार न्युज इंदापुर ,यासह अन्य पत्रकार ब़ाधव मोठ्या संख्येनी उपस्थित होते यावेळी जिजामाता माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी वर्गाच्या वतीने सुंदर अशा पध्दतीने सामाजिक धार्मिक गितांचा नुत्युअविष्कार कार्यक्रम साजरा करण्यात आला नागपंचमी हा प्रामुख्याने महिला वर्गाचा सर्वात महत्वांचा सण असतो तरी देखील जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळ सराटी विद्यालयांच्या प्रांगणामध्ये विद्यार्थी व महिला पालक वर्गानी मोठी गर्दी केली होती जिजामाता उच्चमाध्यमिक विद्यालयाच्या परिसरात खेळण्यांचे स्टाँल, पाळणे,खाऊगल्ली स्टाँल वाले यांच्यामुळे या नागपंचमी सणाला यात्रेचे स्वरूप आले होते