मुंबई : मराठी पत्रकार परिषदेच्या 42 व्या राष्ट्रीय अधिवेशनाची नांदेड येथे जोरदार तयारी सुरू असून 17 व 18 ऑगस्ट रोजी हे अधिवेशन अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे विवीध सत्रां मधून विचारवंतांची मेजवानी या अधिवेशनात मिळणार आहे या अधिवेशनाच्या जय्यत सुरू असून नुकताच सरचिटणीस अनिल महाजन व सोशल मीडिया चे समन्वयक अनिल वाघमारे यांनी नांदेड येथे जाऊन तयारीचा आढावा घेतला यावेळी त्यांनी या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष खासदार प्रतापराव चिखलीकर यांचीही भेट घेतली चर्चा केली .
मराठी पञकार परीषदेचे 42 वे राष्ट्रीय अधिवेशन नांदेड येथे 17 व 18 आॕगस्ट रोजी संपन्न होणार आहे दोन दिवस भरगच्च कार्यक्रमाची मेजवाणी पञकारा साठी या अधिवेशनात असून .या अधिवेशनास अनेक मान्यवराची हजरी लागणार आहे .या अधिवेशनाचे तयारीचा आढावा घेण्या साठी मुख्य विश्वस्त एस एम देशमूख यांचे सुचने वरून सरचिटणीस अनिल महाजन यंनी सर्व व्यवस्थाचा आढावा घेतला यावेळी सोशल मिडीयचे राज्य समन्वयक अनिल वाघमारे हे हि त्यंचे सोबत होते यावेळी कार्यक्रमा साठी निवडलेल्या भक्ती लाॕन्स या स्थळाची पहाणी केली निवास व्यवस्थेची पहाणी केली .त्यांनंतर बैठक घेऊन सर्व व्यवस्था नियोजन समित्या यांचा आढावा घेण्यात आला .नांदेड जिल्हा पञकार संघ व महानगर पञकार संघ यांची जय्यत तयारी करत असून दोन हजार पेक्षा जास्त पञकार या अधिवेशनास येतील असा अंदाज असून राज्यातील पञकाराची कुठलीही गैरसोय होणार नाही यांची दक्षता घेतली जात आहे निवासा भोजन कार्यक्रम येणारे पाहूणे यांच्या व्यवस्थाचे नियोजन करण्यात आले असून रोज या सार्व व्यवस्थाचा आढावा घेतला जात आहे .जय्यत तयारी करून हे अधिवेशन ऐतीहासीक करण्याच निर्धार करण्यात आला आहे.या वेळी जिल्हाध्यक्ष प्रदीप नागापूरकर प्रदेश कार्यकारणी सदस्य प्रकाश कांबळे विभागीय साचिव विजय जोशी उपाध्यक्ष विजयभाऊ दगडू महानगर अध्यक्ष विश्वनाथ देशमूख कार्याध्यक्ष रवि संगणवार जिल्हा सरचिटणीस सुभाष लोणे लक्ष्मण भवरे कृष्णा उमरीकर बीडजिल्हा उपाध्यक्ष सय्यद शाकेर जेष्ठ पञकार नागनाथ सोनटक्के आदी सह जिल्हा भरातून आलेले पञकार उपस्थीत होते.
**स्वागतअध्यक्ष खा.चिखलीकर यांची भेट
या अधिवेशनाचे स्वागतअध्यक्ष खा.प्रतापराव पाटील यांची भेट घेऊन अधिवेशनाचे नियोजना बद्दल चर्चा केली .हे अधिवेशन भव्य दिव्य होईल असा विश्वास खा.चिखलीकर यांनी व्यक्त केला सविस्तर चर्च झाली त्यांना परीषदेच्या वतीने वाढदीवसच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
बाळू राऊत प्रतिनिधी