बिलोली दि,०७ :- गेल्या सहा सात दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे शेतातील पिकाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या तालुक्यातील नागापूर एका १८ वर्षीय तरूण शेतकऱ्याचा विद्युत पंपाच्या तुटून पडलेल्या तारेस स्पर्श झाल्याने मृत्यू झाल्याची घटना दि.७ आँगस्ट रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली.
मौ.नागापुर येथील १८ वर्षीय तरूण शेतकरी चक्रधर दत्ताञय कदम हा दि.६ आँगस्ट रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास सोयाबीन पिकावर पडलेल्या किडअळीची पहाणी करण्यासाठी
गेला.स्वतःच्या शेतातील पिकाची पाहणी करीत असताना शेतातील विद्युत पंपासाठी वाज पुरवठा करणारी तार तुटून पिकात पडल्याचे दिसून आले नसल्याने चक्रधर याचा तुटून पडलेल्या तारेस पायाचा स्पर्श झाल्याने त्या तरूण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला.शेतातील पिकाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या तरूणाचा मृत्यू झाल्याची घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.आमदार सुभाष साबने यांनी तात्काळ नागापुर येथे भेट देऊन कदम कुटुंबाचे सात्वन करून आर्थिक मदत केली.आहे व संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष बालाजी पा.शिंदे,बिलोलीचे माजी नगराध्यक्ष यादवराव तुडमे,शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख विश्वनाथ पा.संमन, तालुका प्रमुख बाबाराव पा.रोकडे ,भाजपा युवा मोर्चाचे इंद्रजीत तुडमे यानी कुटुंबाचे सांत्वन केले.मयत चक्रधर कदम याचे पार्थीव देहावर सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास मोठ्या शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले.
बसवंत मुंडकर बिलोली प्रतिनिधी