मुंबई दि,१९ :- घाटकोपर येथीलअखिल महिला सशक्तीकरण ट्रस्टच्या मुख्य सल्लागार , समाजसेविका गीता सिंह यांच्या आयोजनाखाली मुंबईतील शेर ए पंजाब हॉल येथे उत्तर भारतीय महिलांसाठी कझरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले . उत्तर प्रदेश व बिहार मधील कझरी हा धार्मिक व पांरपारिक सण असून या कझरी महोत्सवात महिला दिवसभर निरंकारी उपवास धरून , विविध रंगाच्या साड्या नेसून , सजून धजून , गजरा केसांत ओवून कझरी गाण्यावर नाचून उत्सव साजरा करतात . अखिल महिला सशक्तीकरण ट्रस्ट तर्फे आयोजित या कार्यक्रमात मुंबईतून विविध भागातून उत्तर भारतीय महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या . यावेळी आलेल्या सर्व महिलांना ट्रस्टच्या राष्ट्रीय अध्यक्षा प्रतिभा ठाकूर व मुंबई अध्यक्षा नीलम ठाकूर यांच्या हस्ते भेट वस्तू व झाडे देऊन सन्मानित करण्यात आले . अखिल महिला सशक्तीकरण ट्रस्ट तर्फे वर्षभरात विविध कार्यक्रमासहित , आदिवासी भागातील गोरगरिबांना शैक्षणिक साहित्य व उपक्रम घेतले जाते .
बाळू राऊत प्रतिनिधी