पुणे दि,१९ :- मा.श्री.संदीप पाटील, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांनी वेळोवेळी दिलेल्या सुचनाप्रमाण रविवार दि, १८ रोजी पहाटे स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण यांना मिळालेल्या बातमीनुसार ३ रेकॉर्डवरील आरोपी कडे त्यांच्या ताब्यात असलेल्या २ पिस्तोल व चार चाकी वाहनासह ताब्यात घेवुन कारवाई करणेत आलेली होती.व या आरोपी यांना पुढील कारवाई कामी शिरूर पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आले होते…सदरची कारवाईनंतर श्री.पदनाकर घनवट, पोलीस निरीक्षक,
स्थानिक गुन्हे शाखा,पुणे ग्रामीण यांनी दिलेल्या सुचनाप्रमाणे खालील नमुद पोलीस अधिकारी व कर्मचारी हे वडगाव मावळ पोलीस स्टेशनचे हददीत रात्रीचे वेळी रेकॉर्डवरील पाहिजे असलेल्या फरारी आरोपीचा शोध घेत असताना मुंबई पुणे महामार्गावर वडगाव फाटा येथे दोन इसम हे काळे रंगाचे मोटार सायकल नंबर एम.एच.०८ टी ५२२१ वरून हॉटेल ज्योतिलिंग जवळ येणार असल्याची पोलिसांना खबर मिळाल्यानंतर पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी सदर ठिकाणी वॉच ठेवला असताना काळे रंगाचे मोटार सायकल नंबर एम.एच.०८/टी/५२२१ या मोटार सायकल वर २ इसम त्या ठिकाणी आले असता त्यांना ताब्यात घेवुन अंगझडतीत घेतली असताना त्यांच्या कडे एक गावठी पिस्तोल एक जीवंत काडतुस व मोटार सायकल असा एकुण साठ हजार शंभर रुपये.चा मुद्देमाल मिळून आला असुन पुढील कारवाई वडगांव मावळ पोलीस स्टेशन करीत आहे.मा.श्री.संदीप पाटील, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांनी दिलेल्या सुचना प्रमाणे अवैध शस्त्रे जवळ बाळगणारे लोकांची माहिती काढुन त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे माहिती पुणे ग्रामीण श्री.पद्माकर धनवट, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाला,पुणे ग्रामीण यांनी सांगितले आहे. सदरची कामगिरी ही मा.श्री.संदीप पाटील, पोलीस अधीक्षक,पुणे ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी केलेली आहे.श्री.पद्माकर धनवट,श्री.गणेश क्षिरसागर,श्री.दत्तात्रय जगताप,श्री.प्रकाश वाघमारे श्री.गणेश महाडीक,वरीष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण,सहा.पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा,पुणे ग्रामीण सहा.पोलीस उप निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा,पुणे ग्रामीण पोलीस हवालदार ब.नं. ९०९, स्थानिक गुन्हे शाखा,पुणे ग्रामीण,पोलीस नाईक ब.नं. १९२५, स्थानिक गुन्हे शाखा,पुणे ग्रामीण यांनी केली आहे