चोपडा दि,१९:- जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्ताने चोपडा येथे दि,१८ रविवार रोजी नगरपरिषद नाट्यगृह येथे राष्ट्रीय ख्यातीचे छायाचित्रकार श्री नितीन मेश्राम,उर्फ बंटी सर यांचे फोटोग्राफर बांधवांसाठी वेडिंग फोटोग्राफी वर्कशॉप आयोजित केले होते.
ह्या कार्यक्रमात जिल्ह्यातील जवळपास १५० फोटोग्राफर बांधवांनी सहभाग घेतला. याप्रसंगी ऑल महाराष्ट्र राज्याचे फोटोग्राफर असोसिएशन
चे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री गणेश जी घरात सर व श्री राजेंद्र पाटील जळगाव जिल्हा अध्यक्ष त्याचप्रमाणे दिगंबर जाधव सर व ऑल महाराष्ट्र फोटोग्राफर असोसिएशन चे राज्य तथा जिल्हा लेवल वरून पदाधिकारी उपस्थित होते.
सदर वर्कशॉप चे उद्घाटन चोपडा नगरपालिकेचे सत्ताधारी पक्षाचे गटनेते माननीय श्री जीवन भाऊ चौधरी यांनी केले.
तसेच दिनांक १९ रोजी जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्ताने चोपडा शहरातील व तालुक्यातील जवळपास १५० फोटोग्राफर बांधवांनी मोटर संपूर्ण चोपडा शहरातून अतिशय शांतते प्रियने आपला सहभाग नोंदविला व रॅलीचे समारोप मानव सेवा तिर्थ वेले तालुका चोपडा ज्या ठिकाणी बेवारस मनोरुग्ण असतात त्यांच्यावर तिथे उपचार होतो त्यांची राहण्याची व्यवस्था होते . त्यांच्या जेवणाची व्यवस्था होते येथे करण्यात आला. त्याचप्रमाणे याठिकाणी ऑल महाराष्ट्र फोटोग्राफर असोसिएशनच्यावतीने कॅमेरा पूजन वृक्षारोपण व मानव सेवा तिर्थ वेले येथील 55 रुग्ण, प्रभुंना जेवणाचा खर्च खर्च समारंभासाठी उपस्थित माजी विधानसभा अध्यक्ष माननीय श्री अरुणभाई गुजराथी , सत्ताधारी पक्षाचे गटनेते जीवन भाऊ चौधरी, लोक नियुक्त नगराध्यक्षा सौ मनीषाताई चौधरी, तळा गळ्यातले समाजसेवक डॉक्टर श्री चंद्रकांत बारेला, तहसीलदार अनिल गावित, चोपडा शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक श्री लोकरे साहेब.यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यशोदा ई फोटो स्टुडिओचे संचालक श्री ए.पी. पाटील सर यांनी केले तर आभार प्रदर्शन निशांत फोटो स्टुडिओ चे संचालक श्री प्रशांत भाऊ चौधरी यांनी केले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठीऑल महाराष्ट्र फोटोग्राफर असोसिएशन चोपडा शहर प्रमुख श्री ज्ञानेश्वर भाऊ सैंदाणे व असोसिएशनचे सदस्य माननीय विलास भाऊ कोष्टी,विनोद भाऊ जाधव, युनूस भाई, रोहित पाटील, शफिक भाई,
मृणाल विसपुते व समस्त ऑल महाराष्ट्र फोटोग्राफर असोसिएशन सदस्य यांनी प्रयत्न केले.
विलास पाटील (चौधरी) जळगाव प्रतिनिधी