पुणे दि २४ :- महाराष्ट्रामध्ये काही दिवसांपासून पोलिसांवर हात उचलण्याचे,व त्यांच्याशी अर्वोच्च भाषेमध्ये बोलत अरेरावी करणं हे प्रकार वाढले आहेत. पुण्यात काही दिवसांपूर्वी एका महिलेने दारूच्या नशेत गाड्या ठोकून पोलिस स्थानकात कपडे उतरवण्याची भाषा करत उर्मटपणे उत्तरं दिल्याचा हि प्रकार घडला आहे. तर मुंब्रा मध्ये काही तरुणांनी वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांना भररस्त्यात मारहाण केल्याचे पाहायला मिळाले. या झटापटीत पोलिसांचे कपडेही फाडले होते. आता या प्रकारानंतर नितीन नांदगावकर यांनी पोलिसांना अशा समाजकंटांना अद्दल शिकवा असा सल्ला दिला आहे.
पोलिसांनी आता या समाजकंटकांना अद्दल न शिकवल्यास स्वतः नितीन नांदगावकर हातात कायदा घेऊन त्यांची धिंड काढणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
नितीन नांदगावकर यांनी फेसबूक पोस्टच्या माध्यमातून एक व्हिडिओ हि शेअर केला आहे. मागील आठवड्याभरात पोलिसांचे खच्चीकरण करण्याचे दोन प्रकार समोर आले आहेत. आता पोलिसांची महाराष्ट्रामध्ये भीती नसेल तर कसे चालेल? असा प्रश्न विचारला आहे. यांनी फेसबूक पोस्टच्या व्हिडिओच्या माध्यामातून समाजकंटांना फटकवून काढा असा सल्ला नितीन नांदगावकर यांनी दिला आहे. तसेच बघ्यांच्या गर्दीवरही त्यांनी टीका केली आहे. पोलिस वर्दीवर हात उचलणार्यांवर देशद्रोहाचा गुन्हा करण्याची मागणी केली आहे.
नितीन नांदगावकर यांचा इशारा
महाराष्ट्रात पोलिस अशा समाजकंटकांना ठोकू शकत नसतील तर मी स्वतः येऊन अशा लोकांना ठोकणार आहे असा इशाराही त्यांनी दिला आहे. मागील काही दिवसात पोलिसांवर हात उचलण्याचे प्रकार वाढल्याने आदर नाहीतर किमान भीती वाटावी अशी भूमिका पोलिसांनी घेणं आवश्यक असल्याचं नितीन नांदगावकर यांनी सांगितलं आहे.