पुणे दि,२५ :- औंध मध्ये दहीहंडी पाहण्यासाठी गेलेल्या फिर्यादी व आरोपी यांची समोर समोर पाहण्यावरून व जुन्या भांडणाचा राग मनात असल्यामुळे यावरून तिथे त्यांची भांडण झाले व तिथे काही त्यांच्या मित्रांनी मिटून पुढे घरी निघाल्यानंतर परत सर्जा हॉटेल समोरच्या परिसरात फिर्यादी यांना थांबून जुन्या भांडणाचा राग मनात धरून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना औंध परिसरात शनिवारी रात्री ११,३० वाजता घडली आहे. या प्रकरणी फिर्यादी श्रवण जाधव ( रा. तुकाराम नगर, सोमेश्वर वाडी पुणे ) याने फिर्याद दिली आहे. आरोपी क्रमांक १) बाळू गायकवाड, पाषाण, २)प्रवन जाधव,सोमेश्वर वाडी ३) किशोर रामावत, लमान वस्ती पाषाण, यांच्यावर चतु:श्रीगी पोलिसांनी गुन्हा.दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व जखमी इसम यांच्या मध्ये जुन्या भांडणाचा राग मनात धरून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे आरोपींनी श्रवण यास डोक्यात कोयत्याने व पाठीत तलवारीने वार करून त्याला जखमी केले.व आरोपी तिथून पळुन गेले आहेत आरोपीचा पुढील तपास चतु:श्रीगी पो.उप.निरी, बी.व्ही. दोडमीसे करत आहेत