पुणे,दि.२५ :-पुणे डेक्कन पोलीस स्टेशनच्या हद्दीत बालगंधर्व मार्शल पो,शि, एस शिंदे व अवघुत जमदाडे यांच्यासोबत शनिवारी रात्री गस्त घालत होते. यावेळी त्यांना पहाटे दोनच्या सुमारास मोटरसायकल घेऊन बालगंधर्व चौकाच्या हद्दीत रात्रीची पेट्रोलिंग करीत असताना घोले रोड या ठिकाणी आले त्यावेळी तेथे ऍरिझोन स्नुकर अॅण्ड क्लब मध्ये ग्राहकांना मॅगी कॉपी व कोल्ड्रिंग इत्यादी पदार्थाची विक्री चालू ठेवल्याने त्यांना दिसले व पोलीस शिपाई अवघुत जमदाडे यांनी बंद करायला सांगितले असता असताना पोलीस शिपाई अवघुत जमदाडे यांना क्लब चालकाने पोलीस कर्मचाऱ्यास हॉटेल बाहेर ढकलून पोलीस अधिकाऱ्यास धक्का-बुक्की व अरेरावीची भाषा केली. त्यांच्याशी हुज्जत घालून तुला काय करायचे ते कर, मी क्लब बंद करणार नाही असा दम दिला. यानंतर तेथे आलेल्या प्रभारी नाईटवरील पोलीस अधिकाऱ्यासही धक्का-बुक्की केली.व सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्याला अटक केली आहे ही घटना ऍरिझोन स्नुकर ऍण्ड क्लबमध्ये पहाटे दोन वाजता घडली. या प्रकरणी निलेश आनंद पाटील(35,रा.पाटील बंगला, घोले रस्ता, शिवाजीनगर पुणे याला डेक्कन पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक ए.आर.महाजन पुढील तपास करत आहे