लोणी काळभोर,दि २४ :- पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण येथे कार्यरत असणारे पोलीस निरीक्षक श्री. पद्माकर घनवट यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, लोणीकाळभोर गावच्या हद्दीत तरवडी रानमळा रोडवरील
खंडोबा मंदीराजवळ एक टेम्पो गुटखा घेऊन येणार आहे टेम्पो हा आशयर कंपनीचा असून त्याचा नंबर एम.एच.०४ एच.वाय.३७५५ यामध्ये मोठया प्रमाणावर गुटखा भरलेला असून त्यामधून हा माल एका पिकअप टेम्पो नं. एम.एस. १२ एन.एक्स.७९९७ यामध्ये भरण्यात येणार आहेत तसेच गोपनीय बातमीदाराने माहीती लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे देखील दिलेली होती. बातमीचे अनुशंगाने मा. पोलीस अधीक्षक श्री. संदीप पाटील साो., मा.अपर पोलीस अधीक्षक श्री. जयंत मीना सो., मा. उप विभागीय पोलीस अधिकारी श्री.सई भोरे-पाटील सो. यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. घनवट यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस हवालदार उमाकांत कुंजीर, पोलीस नाईक विजय कांचन, पोलीस कॉन्स्टेबल धिरज जाधव यांचे पथक कारवाईकामी रवाना केलेले होते त्यांनी, तसेच
लोणीकाळभोर पोलीस स्टेशनकडील पोलीस निरीक्षक श्री. सुरज बंडगर यांचे मार्गदर्शनाखालील पोलीस उप निरीक्षक एस.ए.बोरकर, पो.स.ई.ननवरे, पो.ना.सांगळे, ब.नं. २०६६, पो.कॉ.कोळेकर, ब.नं. २१६२, पो. कॉ.कडु, ब.नं. २४६९ यांनी संयुक्तरित्या सदर ठिकाणी मिळालेल्या बातमीप्रमाणे छापा टाकला असता आशयर कंपनीचा टेम्पो नं. एम.एच. ०४ एच.वाय.३७५५ यामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला
गुटखा, पान मसाला पोलिसांना मिळून आलेला असून या टेम्पाचे पाठीमागे पिकअप गाडी नं. एम.एच १२ ए.एक्स. ७९९७ या मध्ये प्रतिबंधीत केलेला गुटखा, पान मसाला भरताना नामे नवनाथ नामदेव काळभोर व महेश वालचंद जगताप, रा. लोणीकाळभोर, ता. हवेली, जि. पुणे हे मिळून आलेले आहेत पोलिसांनी केलेल्या कारवाईदरम्यान एकुण माल हा ५०,४५,२८८/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.व पुढील तपास लोणी काळभोर पोलीस स्टेशन करीत आहेत व मा. सह आयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग, पुणे यांना पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.