नवी दिल्ली दि, ०१ :- वृत्तसंस्था – पेटीएम, फोनपे, गुगल पे व इतर मोबाईल वॉलेट वापरणाऱ्यांनी जरा सावध व्हा, अन्यथा या वॉलेटमधील अनेक फिचर्सचा वापर तुम्हाला करत येणार नाही. RBI ने या वॉलेट कंपन्यांना आपल्या ग्राहकांचे केवायसी करुन घेण्यास अनिवार्य केले आहे. त्यासाठीची अंतिम तारीख 31 ऑगस्ट होती. त्यामुळे केवायसी केलेले नसल्यास आजपासून (1 सप्टेंबर) तुम्हाला वॉलेटमधील अनेक फिचर्सचा वापर करता येणार नाही. केवायसी म्हणजे Known your custmor. केवायसी करणे सर्वांसाठी आवश्यक आहे. अन्यथा तुम्हाला तुमच्या वॉलेटमधील पैसे वापरता येणार नाहीत.
भारतात 12 पेक्षा अधिक मोबाइल वॉलेट कंपनी –
देशातील 50 कोटी पेक्षा अधिक लोक मोबाइल वॉलेट वापरतात.
पेटीएमचे तर यात 35 कोटी पेक्षा अधिक ग्राहक आहेत. याशिवाय भीम, फोन पे, गुगल पे, मोबिक्विक, फ्री चार्ज, अमेझॉन पे, ओला मनी यासारखे अनेक अॅप आहेत. ज्यांना केवायसी करणे अनिवार्य आहे. यासाठी अंतिम तारीख 31 ऑगस्ट होती