पुणे,दि०२:-.माहे सप्टेंबर २०१९ मधील पहिल्या सोमवारी दि. २/९/२०१९ रोजी गणेश चतुर्थी निमित्त पुणे महापालिकेला सार्वजनिक सुट्टी असल्याकारणाने शासन निर्णयानुसार (महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग, शासन परिपत्रक क्र. प्रसुधा/२०११/प्र.क्र.१८९/११/१८अ, मंत्रालय मुंबई ४०००३२, दि. २६सप्टेंबर २०१२) नुसार लगतच्या दुसऱ्या दिवशी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते.
वरीलप्रमाणे शासन निर्णयानुसार मंगळवार दि. ३ सप्टेंबर २०१९ रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत महापालिकेच्या मुख्य भवनात मा. महापालिका आयुक्त कार्यालय सभागृहात लोकशाही दिनाचे आयोजन केलेले आहे. नागरिकांना नम्र आवाहन –लोकशाही दिनामध्ये निवेदने सादर करणाऱ्या नागरिकांना नम्र आवाहन करण्यात येते कि, नागरिकांनी आपले अर्ज विहित नमुन्यात आवश्यक कागदपत्रांसह सादर करावेत. मनपा मुख्य भवनातील लोकशाही दिनास उपस्थित राहणेकरिता संबंधित नागरिकांनी लोकशाही दिनापूर्वी १५ दिवस अगोदर मनपा मुख्य भवनातील संबंधित विभागाकडे निवेदने / अर्ज २ प्रतीत सादर करणे आवश्यक आहे. या अर्जासोबत क्षेत्रिय कार्यालयाकडील प्राप्त झालेल्या उत्तराची झेरॉक्स प्रत जोडणे आवश्यक आहे. मनपाच्या विविध विभागांकडे लोकशाही दिनाचे १५ दिवसापूर्वी अर्जदारांकडून प्राप्त झालेले अर्ज विहित प्रक्रियेनुसार योग्य अर्जा संदर्भात संबंधित खात्यांनी स्वीकारलेल्या अर्जाबाबत लोकशाही दिनामध्ये पुढील प्रक्रियेकरिता पाठविलेल्या अर्जाबाबत लोकशाही दिनात सुनावणी होईल याची कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी. विहित नमुन्यातील निवेदने / अर्ज नसल्यास अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.कोणते अर्ज स्वीकारले जाणार नाहीत—
१) न्यायप्रविष्ठ बाबी
२) राजस्व/ अपील
३) सेवा विषयक, आस्थापना विषयक बाबी
४) विहित नमुन्यातील अर्ज नसल्यास व त्या सोबत आवश्यक कागद पत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही.
५) अंतिम उत्तर दिलेले आहे/ देण्यात येणार आहे अशा प्रकरणी पुन्हा त्याच विषय संदर्भात केलेले अर्ज वरील प्रमाणे अर्ज लोकशाही दिनाकरिता स्विकारले जाणार नाहीत व अशा अर्जांवर लोकशाही दिनात सुनावणी घेतली जाणार नाही. परंतु वरीलप्रमाणे अर्ज नियमानुसार संबंधित खात्यांनी स्विकारल्यानंतर पुढील ८ दिवसात संबंधित खात्यांकडे पुढील कार्यवाही करिता पाठविण्यात येतील.