पुणे दि,०२ : – बाणेर परिसरातील पान टपरी चालकाने सिगारेटचे पैसे मागितल्या तिघा जणांच्या टोळक्याने कोयता व गुप्तीने वार करुन एका टपरीचालकाचा खुन केला. संतोष नरहरी कदम (वय ३२) रा म्हाळुंगे असे पान टपरी चालकाचे नाव आहे. ही घटना बाणेर येथे डी मार्ट जवळ रविवारी सायंकाळी घडली होती. पोलिसांनी दोन हल्लेखोरांना सोमनाथ कल्याण चतुर,अभिषेक लाला कोरडे, राहणार माळुंगे यांना ताब्यात घेतले आहे.व तिसऱ्या आरोपीचा शोध घेत आहे या बाबत पोलिसांनी सांगितले की, बाणेर येथील डी मार्टजवळ संतोष कदम याची पानटपरी आहे. रविवारी सायंकाळी त्याच्याकडे तिघे जण आले. त्यांनी कदम यांच्याकडे सिगारेट मागितली. त्याप्रमाणे त्यांनी सिगारेटी दिली व त्यांच्याकडे पैसे मागितले. आपल्याकडे पैसे मागतो, याचा राग येऊन तिघांनी कोयता, गुप्तीने संतोष कदम याच्यावर एका पाठोपाठ एक वार केले.
यात जबर जखमी झालेल्या संतोष याला लोकांनी रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरु असताना रात्री उशिरा याचा मृत्यु झाला. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा वैशाली गलांडे मॅडम चतु:श्रृंगी पोलीस करीत आहेत