पुणे दि,०२ : – बाणेर परिसरातील पान टपरी चालकाने सिगारेटचे पैसे मागितल्याने तिघा जणांच्या टोळक्याने गुप्तीने वार करुन एका टपरीचालकाचा खुन केला.होता संतोष नरहरी कदम (वय ३२) रा म्हाळुंगे असे पान टपरी चालकाचे नाव आहे. ही घटना बाणेर येथे डी मार्ट येथे स्वरा पान शॉप नावाने पान टपरी आहे दि,१ रोजी दुपारी २/३० वाजण्याच्या सुमारास त्याच्याकडे तिघे जण आले. त्यांनी संतोष कदम यांच्याकडे सिगारेट मागितली. त्याप्रमाणे त्यांनी सिगारेट दिली व त्यांच्याकडे पैसे मागितले. असतानाआपल्याकडे पैसे मागतो, का आम्ही भाही आहोत असे म्हणून एकाने संतोष याला चापट मारली होती फिर्यादी रामचंद्र प्रभू यांनी मध्यस्थी केल्यानंतर आरोपी निघून गेले होते परंतु त्याच वेळी त्यांनी संतोष तुला बघून घेतो अशी धमकी देऊन गेले होते त्या नंतर सायंकाळी ५: ३० वाजेच्या सुमारास ते पुन्हा पान टपरीवर आले त्यांनी पान टपरीवरचे चालक संतोष यांचे बरोबर भांडण करून गुप्तीने संतोष कदम याच्यावर पोटात खुपसले व त्यांच्यावर वार करून ते दुचाकी गाडीवरून पळून गेले त्यावेळी फिर्यादी यांनी दुचाकीचा क्रमांक पाहिला होता व पोलिसांना माहिती देऊन तो जखमी संतोष यास उपचार करण्याकरता मेडिपॉइंट हॉस्पिटल औंध पुणे येथे अॅडमिट केले असताना उपचार दरम्यान तो रात्री मयत झाला
पुणे शहर पोलिस मा.अपर पोलिस आयुक्त गुन्हे श्री अशोक मोराळे व मा.पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री बच्चन सिंह यांनी गुन्ह्यातील वाहनांचे प्राप्त नंबर आरटीओ क्रमांकावरून सविस्तर माहिती काढून आरोपीचा शोध घेणे कामी मार्गदर्शन केले व सदर वाहनांची आरटीओ क्रमांकावरून मालकाची सविस्तर माहिती प्राप्त करून दिली त्या वरून गुन्हे शाखा युनिटचे ४ चे पथक व चतु:श्रीगी पोलीस स्टेशन कडील पथक संयुक्तरित्या काम करीत असताना सदर वाहन हे विशाल संजय शिंदे राहणार रामकृष्ण मंगल कार्यालय पिंपळे गुरव नवी सांगवी पुणे यांनी वापरल्याचे व त्यांच्यासोबत त्यांचे साथीदार नामे प्रशांत कामसे, सोमनाथ चतुर् उर्फ सोन्या, अभिषेक लाला कोंडे व आणखी एक इसम त्यांनी खुन केल्याचे निष्पन्न झाले व पुणे गुन्हे शाखा युनिट ४ कडील दत्तात्रेय फुलसुंदर व विषाल संजय शिर्के यांना गोपनीय माहिती दाराकडून माहिती मिळाली की आदर्श नगर नवी सांगवी पुणे येथे विशाल शिंदे व प्रशांत कामसे हे एका शाळेजवळ लपून बसले आहे व ते बाहेर गावी पळून जाणार आहे याबाबत मिळालेल्या माहितीवरून त्यांनी दिनांक २ रोजी दुपारी तीन.वाजुन पंधरा मिनिटांन. सापळा रचून पकडण्यात आले या ठिकाणी सोमनाथ कल्याण चतुर उर्फ सोन्या राहणार मुळशी जिल्हा पुणे व अभिषेक लाला कोरडे उर्फ ब्लॅक्या राहणार पिंपळे गुरव नवी सांगवी पुणे यांना चतुर्शिंगी पोलीस स्टेशन तपास पथकाने पकडले आहे यातील फिर्यादी राम प्रभू मोटे यांनी चाणक्य पणे घटनेनंतर .लगीच वाहनांचे नंबर घेतल्याने व तो पोलिसांना तात्काळ यांनी दिल्याने गुन्हा उघडकीस अन्य कामे त्यांनी मदत झाली आहे सदरची कामगिरी ही मा. अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे शाखा श्री अशोक मोराळे, मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग श्री सुनील फुलारी, मा. पोलीस उपायुक्त गुन्हे श्री बच्चन सिंह, मा. उप आयुक्त परिमंडळ ४ श्री प्रसाद अक्कानवरू, मा पोलीस आयुक्त खडकी विभाग श्री लक्ष्मण बोराटे, पोलीस निरीक्षक युनिट ४ गुन्हे शाखा पुणे शहर श्री अजुम बागवान पोलीस निरीक्षक चतु:श्रीगी पो.स्टे. श्रीमती वैशाली गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो नि. गणेश पवार ,पोलिस उपनिरीक्षक संजय झंजाड कर्मचारी दत्तात्रय फुलसुंदर, विशाल शिर्के, सुनील पवार, शंकर संपते, रमेश चौधर, नीलेश शिवतरे, गुन्हे शाखा पुणे शहर व स.पोनि. दत्तात्रेय शिंदे, पोलीस उप-निरीक्षक चव्हाणके ,पोलीस हवा मुकुंद दारू, एकनाथ जोशी ,पो. ना. सारस, साळवी, प्रकाश आव्हाड, विशाल साबळे, अजय गायकवाड, पो.शि. तेजस चोपडे ,ज्ञानेश्वर मुळे, अमर शेख, यांनी कामगिरी केली आहे