पुणे, दि ०४ :- पुणे ते कोलाड येथे ताम्हिणी घाटात दगड कोसळल्याने ताम्हिणीजवळील निवे गावच्या हद्दीत ही दरड कोसळल्याने तिचा सर्व राडारोडा रस्त्यावर आला व त्यामुळे पुण्याहून कोकणात जाणाऱ्यांची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.मुसळधार पावसामुळे ताम्हिणी घाटात दरड कोसळली आहे. हा मार्ग मातीच्या ढिगाऱ्याखाली गेल्याने वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. सुदैवाने कोणतीही जीवित्तहानी झालेली नाही. या घटनेची माहिती समजताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून दरड बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
दरम्यान, धरणक्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु असल्यामुळे जिल्ह्यातील धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे नदीकाठची गावे, वाड्या, वस्त्यामध्ये राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.