पुणे दि ०५ : -पुणे परिसरातून मोटार सायकल रिक्षा व मोबाईल चोरणा-या सराईत चोराला वानवडी पोलिसांनी अटक केली आहे त्याच्याकडून चोरून नेलेली मोटार सायकल १२, व १ रिक्षा व ४५ मोबाईल सात लाख 51, हजार 500 रू किमतीचा मुदेमाल हस्तगत करण्यात आली आहे.1).अजितनाथ लक्ष्मण गायकवाड वय 24 वर्ष रा. कृष्णा नगर मोहम्मद वाडी, पुणे.2) तुकाराम मनोहर चोपडे वय 19 वर्ष रा. कृष्णा नगर मोहम्मदवाडी, पुणे.3)रोहित रामप्रताप वर्मा वय 19 वर्ष रा. कृष्णानगर मोहम्मदवाडी, पुणे.4)पवित्र सिंग गब्बर सिंग टाक
वय 19 वर्ष ,रा. रामटेकडी हडपसर पुणे . (पाहिजे आरोपी)
असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वानवडी पोलीस स्टेशन तपास पथकातील पोलीस नाईक संभाजी देविकर व पोलीस शिपाई नासेर देशमुख यांना मिळालेल्या बातमीवरुन मोटर सायकल व मोबाईल चोरणारे आरोपी हा वानवडी पोलिस स्टेशनच्या हादित येनार आहे दि ०५ :-वानवडी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील सो यानी पुणे शहर व परिसरात वाढत्या वाहनचोरी व व मोबाइल चोरीच्या घटना संदर्भात तपास पथकाची बैठक घेऊन त्याला प्रतिबंध व झालेल्या वाहनचोरी उघड करण्याच्या सूचना दिल्याने वानवडी पोलीस स्टेशन तपास पथक दिलेल्या सूचनांच्या अनुषंगाने हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस नाईक संभाजी देविकर पोलीस शिपाई नासेर देशमुख यांना मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे पोलीस हवालदार राजू राजगे पोलीस शिपाई नवनाथ खताळ पोलीस शिपाई महेश कांबळे पोलीस शिपाई सुधीर सोनवणे व उपरोक्त दोन यांनी मिळून नियोजनबद्ध सापळा रचून कृष्णानगर स्मशानभूमी शेजारी उभे असणारे तीन इसमास ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांच्याकडे मिळालेली पांढऱ्या रंगाची स्प्लेंडर ही चोरीची असल्याचे निष्पन्न झाल्याने व आणखीन काही अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत का हे पाहण्यासाठी घेतलेल्या पोलीस कस्टडीत तपासाअंती … एकूण १२ मोटरसायकल व, एक रिक्षा व पंचेचाळीस मोबाईल चोरल्याचे निष्पन्न झाले एवढ्या मोठ्या प्रमाणात मोटरसायकल व रिक्षा चोरण या संदर्भात विचारले असता हातात काही कामधंदा नसल्याने व कमी वेळेत व कमी कष्टात जास्त पैसा मिळत असल्याने मोटरसायकल चोरुन त्यावरती लेबर कॅम्प किंवा रस्त्याने पायी जाणारे लोकांचे मोबाईल चोरण्यासाठी ते वाहन चोरी करत होते तसेच एकदा चोरलेली मोटर सायकल ते पोलीस सापळा लावतात या कारणाने परत मोबाईल चोरी करण्यासाठी वापरत नसत त्यामुळे शहरातील वेगवेगळ्या ठिकाणाहून मोटरसायकल चोरी केल्याची त्यांनी कबुली दिली आहे ही सदरची कामगिरी मा. अप्पर पोलीस आयुक्त श्री सुनील फुलारी सो , मा पोलीस उप आयुक्त सुहास बावचे सो , स पो अा सुनील कलगुटकर सो यांचे मार्गदर्शनाखाली आणि व पो नि वानवडी पो स्टेशन क्रांतीकुमार पाटील सो , पो नि गुन्हे सलीम चाऊस सो यांचे सूचनेनुसार.वानवडी तपास पथकातील पो उप नि अंकुश डोंबळे , सहा पो फौजदार रमेश भोसले , पो हवा राजु रासगे , पो ना योगेश गायकवाड , संभाजी देवीकर , पो शि नवनाथ खताळ , महेश कांबळे , नासेर देशमुख , सुधीर सोनावणे , अनुप सांगले , प्रतीक लाहीगुडे या विशेष पथकाने केली आहे व पुढील तपास पो.नि.क्रांतीकुमार पाटील वानवडी पो स्टेशन करीत आहे