टेंभुर्णी दि ११ :- वसंतराव येवले-पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलसाठी बांधून दिलेले प्रवेशद्वार हे सर्वांसाठी प्रेरणादायी असून येवले-पाटील यांच्या सामाजिक बांधिलकीचा सर्वांनी बोध घ्यावा असे आवाहन आमदार बबनराव शिंदे यांनी केले.टेंभुर्णीतील न्यू इंग्लिश स्कूल या शाळेला वसंतराव येवले-पाटील यांनी आपल्या वडिलांच्या पुण्यस्मरणानिमित्त अडीच लाख रुपये खर्च करून भव्य प्रवेशद्वार बांधून दिले.या प्रवेशद्वाराचे उदघाटन आमदार बबनराव शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत संस्थेचे जनरल बॉडी सदस्य बाळासाहेब पाटील होते.यावेळी विभागीय अधिकारी कमलाकर महामुनी,व्हाईस चेअरमन विजयकुमार डूरेपाटील,इतिहास संशोधक व्व्याख्याते श्रीमंत कोकाटे,रमेश येवले- पाटील,प्रभाकर कुटे,डॉ.राहुल पाटील,बाबासाहेब शिरसागर,सज्जन पवार,बाळासाहेब कोठारी, शिलाताई पाटील,भास्कर सोनवणे,गोरख देशमुख, रावसाहेब ताठे,वसंत येवले-पाटील, परमेश्वर देशमुख,शाळेचे मुख्याध्यापक डी.टी. गोंजारी आदी मान्यवर उपस्थित होते.पुढे बोलताना आमदार बबनराव शिंदे म्हणाले की,रयत शिक्षण संस्था ही एका ध्येयाने व एका विचारांनी काम करणारी संस्था आहे.देणगी दाराकडून मदत घेऊन संस्थेची प्रगती करणे त्याचबरोबर शैक्षणिक प्रगती करणे हे या संस्थेचे ध्येय आहे.या संस्थेचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब असून त्यांच्या नेतृत्वाखाली या शाळेची प्रगतीकडे वाटचाल चालू आहे.या शाळेसाठी असणाऱ्या अडचणी आपण नेहमी सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे व पुढेही करू असेही ते म्हणाले.यावेळी बाळासाहेब पाटील यांनी येवले-पाटील कुटुंबीय व न्यू स्कूल यांचे जुने नाते असून त्याला उजाळा दिला तर श्रीमंत कोकाटे यांनी वस्तुनिष्ठ इतिहास सांगण्याचा प्रयत्न केला.तसेच कमलाकर महामुनी यांनीही आपले विचार व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक गोंजारी यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामलिंग बरबडे सर व पोपट मोरे सर यांनी केले तर आभार महादेव पवार सर यांनी मांडले.हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी शाळेतील शिक्षक सुनील मिरगणे,रामभाऊ लष्कर,शंभू शिंदे, यशवंत लोंढे,अमोल डायरे,विशालजाधव,देशमुख,आर.आर.खंडागळे,आर.एस.उबाळे, आर.बी.खंडागळे आदींनी परिश्रम घेतले.
अनिल भागवत जगताप मु.पो.टेंभुर्णी ता.माढा जि सोलापुर प्रतिनिधी