पुणे दि १३ :- लष्कर पोलीस स्टेशन, व खडकी पोलीस स्टेशन, पुणे शहर पोलीस स्टेशन हद्दीतील उत्कर्ष स्कुलमध्ये परेडचे आयोजन दि.१३/१२/२०१९ रोजी सकाळी ६/३० वाजता लष्कर पोलीस स्टेशन हद्दीतील सेंट अॅन्थोनी हायस्कुल सोलापुर बाजार कॅम्प पुणे, येथील शाळेचे ग्राउंडवर .तसेच पुणे
खडकी पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात सेंट जोसेफ गर्ल्स हायस्कुल, खडकी पुणे येथे परिमंडळीय समारंभ कवायतीचे आयोजन पोलीस आयुक्त साो, पुणे शहर यांचे आदेशान्वये सिरमोनीयल परेडचे आयोजन करण्यात आले होते. व पोलीस उप आयुक्त साो,परिंमडळ -२, पुणे शहर यांनी परेडची मानवंदना
स्वीकारली.परेड करीता परेड कमांडर म्हणुन सहा.पोलीस आयुक्त लष्कर विभाग, रविंद्र रसाळ, सेकंड परेड कमांडर राखीव पोलीस निरीक्षक शिवाजीनगर मुख्यालय गोटमवाड यांनी काम पाहीले. परेड करीता ०५ वरिष्ठ पोलीस निरीक्षक, १२ पोलीस उप निरीक्षक व १२५ पोलीस कर्मचारी हजर होते. परिमंडळ – २ मधील ०२ प्लाटून, मुख्यालयाकडील ०१, वाहतुक शाखेकडील ०१ असे एकुण ०४ प्लाटून नेमण्यात आले होते. सकाळी ७ : ३० वाजता परेड मार्च झाली व ०८ : ४५ वाजता परेड समाप्त करण्यात आली. यादरम्यान सेंट अॅन्थोनी हायस्कुल, सोलापुर बाजार व उत्कर्ष इंग्लीश मिडीयम स्कुल या दोन शाळांचे सुमारे बाराशे विद्यार्थी | विद्यार्थीनी शिक्षक हजर होते. यादरम्यान सिरमोनियल परेड नंतर परेडचे महत्व, पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, यांनी विद्यार्थ्यानां समजावून सांगीतले. धिरेचाल तेज चाल, सॅल्युटचे प्रकार, रायफल विषयी माहीती शाळेतील विद्यार्थ्यांना दिली.
पोलीस गणवेश बद्दल विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण करणे, पोलीस आपल्या सुरक्षिततेसाठी आहेत ही भावना
विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणे व उदयाची नवीन पिठी गुन्हेगारी पासुन दुर ठेवणे या दृष्टीकोनातून पुणे पोलीसांतर्फे
राबविण्यात आलेल्या अनोख्या उपक्रमामुळे विद्यार्थी व शिक्षक यांनी उपक्रमाचे कौतुक केले. व मा. पोलीस आयुक्त साो, पुणे शहर यांचे या उपक्रमामुळे आभार मानले.तसेच पुणे
खडकी पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात सेंट जोसेफ गर्ल्स हायस्कुल, खडकी पुणे येथे परिमंडळीय समारंभ कवायतीचे आयोजन करणेत आले होते. सदर समारंभ कवायत सकाळी ०७/३० वा. सुरु होवुन ०८/३० वा. समाप्त झाली. समारंभ कवायतीची मानवंदना मा. श्री प्रसाद अक्कानवरु पोलीस उप आयुक्त परिमंडळ ४ पुणे शहर यांनी स्विकारली. सदर परेड मा. सहा. पोलीस आयुक्त येरवडा विभाग, पुणे शहर यांचेसह ६ पोलीस निरीक्षक, ९ सपोनि/पोउपनि, ८८ पोलीस कर्मचारी व बॅन्डपथकाचे १२ पोलीस कर्मचारी यांचे उपस्थितीत उत्कृष्ठ कवायत प्रदर्शनात पार पडली. सदर परेडचेवेळी सेंट जोसेफ हायस्कुलचे साधारण २५०० ते २७०० विद्यार्थी तसेच त्यांचे पालक, शिक्षकवृंध व इतर प्रतिष्ठीत नागरीक उपस्थित होते. त्यांनी सदर कवायत समारंभाचा मनमुराद आनंद घेतला. अशाप्रकारचे कवायत समारंभामुळे उद्याचे भविष्य असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रेरणा व प्रोत्साहन मिळुन त्यांचे मनात पोलीसांप्रती सौदार्हयाची भावना वाढीस लागनेस मदत होईल